नवी मुंबईत दोन्ही सेनेत धुसफूस

मंगळवारी नवी मुंबईत नेरुळ इथे ‘ बाळासाहेबांची शिवसेना ‘ या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत उपनेते विजय नाहाटा यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली होती. याचे पडसाद उमटले असून विठ्ठल मोरे आणि द्वारकानाथ भोईर या दोन्ही मतदारसंघाच्या अध्यक्षांनी विजय नाहाटा यांच्या आरोपाला उत्तर दिले. महाप्रबोधन यात्रा पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रशांना उत्तरे देताना विठ्ठल मोरे यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या.     

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

हेही वाचा… मुलाच्या अपहरणानंतर ५० कोटी रुपयांची मागणी करणारा तो व्हॉट्सॲवरील संदेश कोणी पाठविला होता…

 “उद्धव ठाकरे भेट देत नव्हते, त्यामुळे कामे होत नव्हती. याच कारणाने कार्यकर्ते नाराज होते त्यामुळे मी शिवसेना सोडली ” असे वक्तव्य उपनेते विजय नाहटा यांनी केले होते. या आरोपांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून उत्तर देण्यात आले. तत्कालीन प्रशासकीय अधिकारी असलेले व नवी मुंबई आयुक्त कोकण विभागीय आयुक्त अशी पदे भुषविल्यानंतर विजय नाहाटा निवृत्त झाले. दरम्यान दुसरी इनिंग त्यांनी राजकरणात प्रवेश करून सुरु केली, त्यांना मीच शिवसेनेत आणले असा दावा नवीमुंबई – बेलापूर शिवसेना अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी केला. मात्र मला आता त्याचा पश्चाताप होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा… विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

विजय नाहाटा यांना शिवसेनेने उपनेते पद, प्राधिकरण तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ आणि म्हाडा सारखी दोन महामंडळे दिली. तरीही नाहाटा उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेत असल्याबद्दल मोरे यांनी संताप व्यक्त केला. त्याच बरोबर म्हाडा महामंडळात ८० बैठका झाल्या शेकडो निर्णय घेण्यात आले, ही कामे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून केलीच ना ? तरीही कामे होत नाहीत म्हणून आरडा ओरडा का करता ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुमारे दोन वर्ष करोनाचा काळ होता, त्यात स्वतः उद्धव ठाकरे गंभीर आजारपणात होते, अशा वेळीही ते अनेकांना भेटत होते. तरीही ओरड केली जाते, उद्धव ठाकरे भेट देत नाहीत. सामान्य व्यक्ती तरी या काळात मित्र नातेवाईक यांना भेटत होते का असा सवाल द्वारकानाथ भोईर यांनी उपस्थित केला. नाहाटा यांना खोटे बोलण्याचा आजार असल्याचा घणाघाती आरोपही विठ्ठल मोरे यांनी केला.

Story img Loader