नवी मुंबई – गणेशोत्सवादरम्यान महापालिका श्री मूर्ती विसर्जन करण्यासाठी स्थानिक पट्ट्यातील पोहणाऱ्या तरुणांची तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर स्वयंसेवक म्हणून नेमणूक करते. मात्र या तरुणांना कोणतेही विमा सुरक्षा महापालिकेकडून दिली जात नाही. मात्र तरीही मुले काम करीत असतात. राज्य शासनाने ज्याप्रमाणे गोविंदांना विमा कवच दिले आहे त्याप्रमाणे श्री मूर्ती विसर्जन करणाऱ्या स्वयंसेवकांनादेखील महापालिका विम्याचे सुरक्षा कवच द्यावे, अशी मागणी होत आहे.

नवी मुंबईत दिघ्यापासून ते बेलापूरपर्यंत एकूण २३ तलावात दरवर्षी श्री मूर्तींचे विसर्जन केले जाते. या मूर्त्या विसर्जन करण्यासाठी स्थानिक विभागतील पोहणाऱ्या ७०० हून अधिक स्वयंसेवकांची महापालिका त्या दिवसांसाठी नेमणूक करते. या दिवसांत नवी मुंबईत ३० हजारांहून अधिक घरगुती व १५००च्या घरात सार्वजनिक श्री मूर्तीचे विसर्जन केले जाते. मात्र मूर्ती विसर्जन करतेवेळी केलेली नेमणूक ही तात्पुरत्या स्वरुपात केली जाते व या बदल्यात या स्वयंसेवकांना अल्प मानधन दिले जाते. मात्र या स्वयंसेवकांचा कुठलाही विमा पालिकेच्यावतीने उतरवीला जात नाही.

makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त

हेही वाचा – जागतिक बाजारपेठेत मसाला निर्यातीत भारताला जुने वैभव मिळेल; पीयूष गोयल यांना विश्वास, वर्ल्ड स्पाईस काँग्रेस समारोहाला हजेरी

मूर्ती विसर्जन करतेवेळी जवळपास चौदा चौदा तास स्वयंसेवकांना पाण्यात राहावे लागते. तलावात मोठमोठ्या मूर्त्या विसर्जन करण्यासाठी येत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची जास्त शक्यता असते. तसेच तासनतास पाण्यात राहावे लागत असल्याने आजरी पडण्याचीही जास्त शक्यता असते. मूर्ती विसर्जन करतेवेळी स्वयंसेवकांना १४ ते १६ तास सतत पाण्यात राहावे लागते. त्यामुळे अंगदुखी, डोकं दुखी, सर्दी,आणि तापासारख्या आजारांना समोरे जावे लागते. राज्य शासनाने ज्याप्रमाणे गोविंदांना विमा कवच दिले आहे त्याप्रमाणे श्री मूर्ती विसर्जन करणाऱ्या स्वयंसेवकांनादेखील महापालिका विम्याचे सुरक्षा कवच द्यावे, अशी मागणी कोपरी गावातील श्री मूर्ती विसर्जन स्वयंसेवक विलीन पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा – सिडकोची फसवणूक प्रकरणी शिरीष घरत यांच्या विरोधात गुन्हा दाखल 

श्री मूर्ती विसर्जन करणाऱ्या स्वयंसेवकांना महापालिका मानधन देते. मात्र त्यांचा विमा उतरवत नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाईल. – श्रीराम पवार, उपायुक्त, परिमंडळ २, नवी मुंबई महानगर पालिका.