लोकसत्ता प्रतिनिधी
उरण : रविवारी ( ५ नोव्हेंबर )ला उरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच आणि ४१ सदस्य पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यासाठीचा जाहीर प्रचार शुक्रवारी सायंकाळी थांबला आहे. या निवडणुकीत ४१ जागांसाठी ९० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली. निवडणूकीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आणखी वाचा-नवी मुंबई : ब्लॅक लिस्ट केले म्हणून हत्येचा प्रयत्न, ४ जणांवर गुन्हा दाखल
उरण तालुक्यातील जासई,चिरनेर आणि दिघोडे या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी ५ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. यात जासई ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ३ तर १७ सदस्यपदासाठी ३४ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. चिरनेर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी २ तर १४ सदस्यपदासाठी २८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. दिघोडे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ४ तर ९ सदस्यपदासाठी १९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. असे तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ९ तर तीनही ग्रामपंचायतींच्या ४१ सदस्यपदासाठी ८१ तर सरपंचा सह एकूण ९० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. या निवडणूकीचा जाहीर प्रचार थांबला आहे. गुरुवारी रात्री भाजपने चिरनेर मध्ये जाहीर सभा घेतली या सभेत भाजपचे पनवेल आणि उरण या दोन्ही मतदार संघाचे आमदार उपस्थित होते. त्यांनी विकासाच्या नावाने मते मागितली आहेत.
सोमवारी मतमोजणी
या निवडणूकीची मतमोजणी सोमवारी(६ नोव्हेंबर)ला सकाळी १० वाजता सिडकोच्या बोकडवीरा येथील प्रशिक्षण केंद्रात होणार आहे.