उरण: जेएनपीए मध्ये २०१४ पासून देशातील बंदरावर आधारित पहिला सेझ प्रकल्प उभारला जात आहे. मागील दहा वर्षांपासून हा सेझ प्रस्तावित आहे. रोजगार निर्मिती हा मुख्य उद्देश ठेवून उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पात ६० हजार कोटींची गुंतवणूक करून त्यातून दीड लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र गुंतवणूक कमी झाल्याने आणखी चार वर्षे सेझमध्ये रोजगार उपलब्ध होण्यासाठी लागणार असल्याची माहिती जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली आहे.

यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑगस्ट २०१४ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या प्रकल्पात ६० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित होती. मात्र आता बंदराच्या माध्यमातून जगातील २०० हून अधिक मोठ्या बंदरांशी जोडलेले आहे.

selection process for next chief election commissioner
अन्वयार्थ : सरकारी खातेच जणू…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Industrial production rises to six month high of 5 2 in November print eco news
देशाची कारखानदारी रूळावर येत असल्याची सुचिन्हे!  नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन सहा महिन्यांच्या उच्चांकी  ५.२ टक्क्यांवर
Central government decision farming Relief
दहा वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा; जाणून घ्या, केंद्र सरकारने २०१४ नंतर पहिल्यांदाच कोणता निर्णय घेतला?
devendra fadanvis
३५०० एकर जमिनीचे १०० दिवसांत वितरण; ‘एमआयडीसी’च्या भूखंडांबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश
Sachin | M| Maharashtra Sadan free for literary conference Nagpur news aharashtra Sadan free for literary conference Nagpur news साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत (लोकसत्ता टीम)Tendulkar and Raj Thackeray
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत
Comprehensive development of the village in Palghar district with the help of schemes
समृद्ध गावांसाठी खोमारपाडा प्रारूप; योजनांच्या मदतीने पालघर जिल्ह्यातील गावाचा सर्वांगीण विकास
Devendra Fadnavis
वर्षभराचं टार्गेट सहा महिन्यांत पूर्ण, परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; देवेंद्र फडणवीसांनी दिली आकडेवारी

या एसईझेडपासून नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स हार्बर लिंक, रेल्वे व जागतिक दर्जाचे रस्ते, डेडिकेटेड कोस्टल बर्थ आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर अगदी जवळ आहे. त्यामुळे जेएनपीए-सेझ हे गुंतवणूकदारांसाठी एक फायदेशीर गंतव्यस्थान उदयास आले आहे.

हेही वाचा… गावठाण, झोपड्यांमध्ये कचरा वाहतुकीसाठी ई वाहने; नवी मुंबई महापालिकेची तयारी

जेएनपीएने लगतच आपल्या मालकीच्या २७७ हेक्टर क्षेत्रामध्ये बहू आर्थिक क्षेत्र (सेझ) विकसित करत आहे. नौवहन मंत्रालयाच्या सागरमाला उपक्रमांतर्गत बंदर आधारित औद्याोगीकरण सक्षम करून निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने या बहु-उत्पादन बंदर आधारित सेझचा विकास केला जात आहे. विशेष आर्थिक क्षेत्रातील भाडेपट्ट्यावरील १६३ हेक्टर जमिनींपैकी ६२ हेक्टर जमीन आधीच ३१ युनिट्सना देण्यात आली आहे. ११६ एकरसाठी नुकत्याच झालेल्या ई-लिलावाला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला, २१ बोलीदारांनी १५ भूखंडांसाठी बोली सादर केली.

विशेष म्हणजे, राखीव किमतींपेक्षा वरच्या प्लॉट्सच्या बोलीमध्ये एकूण १५ टक्के वाढ झाली आहे, ज्यामध्ये काही भूखंडांनी राखीव किमतीपेक्षा ४० टक्केपेक्षा जास्त बोली केली आहे. ज्यामध्ये ९ युनिट्स आणि एक फ्री ट्रेड वेअरहाउसिंग झोन (एफटीडब्ल्यूझेड) आधीच कार्यरत आहे. हे ऑपरेशनल युनिट्स वेअरहाऊसिंग, फूड प्रोसेसिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये विभागलेले आहेत. जेएनपीए सेझने अत्यावश्यक पायाभूत सुविधांचा विकास पूर्ण केला आहे, ५६५ रुपये कोटींची गुंतवणूक करून वाटप केलेल्या युनिट्ससाठी कार्य सुरू करण्यासाठी रस्ते, वीज, पाणी आणि इतर उपयोगितांसाठी प्लग-अँड-प्ले तयार सुविधा देण्यात आल्या आहेत.

भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याची मागणी

जेएनपीएचा सेझ प्रकल्पात येथील स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी बाधित गावांतील नागरिकांनी केली आहे. जेएनपीए सेझ प्रकल्पात निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी जेएनपीएकडून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना तसे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले असल्याची माहिती जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली आहे.

Story img Loader