येथील उरण ते अलिबाग या सागरी मार्गावरील उरण मधील करंजा ते अलिबागच्या रेवस या दोन बंदरा दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्यासाठी पाच वर्षांपूर्वीच करंजा जेट्टीची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या मार्गाला जोडणाऱ्या अलिबाग मधील रेवस जेट्टी चे काम रखडल्याने हे सेवा सुरू होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी दोन्ही तालुक्यातील प्रवासी व नागरिकाकडून केली जात आहे.

उरण व अलिबाग या दोन तालुक्यां दरम्यान चार किलोमीटरचे सागरी अंतर असून अनेक वर्षांपासून या मार्गावरून प्रवास करण्यासाठी छोटया बोटीचा ( तरीचा) वापर केला जात आहे. ही सेवा अपुरी असल्याने या सागरी मार्गावर रो-रो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने तयार करून कामाला सुरुवात केली त्यानुसार २५ कोटी रुपये खर्च करून उरणच्या करंजा बंदरात रो रो ची स्वतंत्र जेट्टी तसेच तिकीट घर,कार्यालय व वाहनतळ आदींची उभारणी करण्यात आली आहे. मात्र अलिबाग मधील रेवस जेट्टी चे काम अपूर्ण असल्याने ही सेवा रखडली आहे. रेवस जेट्टीचे काम सुरू असल्याची माहिती मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा : पनवेल : कामोठे ते उरण मार्गावर इंद्रधनुष्याच्या रंगांची बरसात

उरण व अलिबाग मधील अंतर कमी होणार

या रो-रो सेवे मुळे उरण व अलिबागच्या प्रवाशी व नागरिकांना आपल्या चारचाकी वाहनाने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील ५० किलोमीटर पेक्षा अधिकचे रस्ते मार्गातील अंतर कमी होणार आहे.

Story img Loader