शेखर हंप्रस

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसत्ता प्रतिनिधी: नियोजित शहर म्हणून ओळख असणाऱ्या नवी मुंबईत सहज सुलभ चालण्यासाठी “वॉकेबिलिटी” संकल्पना राबवण्यात आली होती. मात्र नव्याचे नऊ दिवस संपताच या उपक्रमाला हडताळ फासला गेला असून पदपथावरून चालणेही मुश्कील झाले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या उपक्रमाचा उल्लेखही करण्यात आलेला नाही किंवा समान उद्दिष्टे असलेल्या योजनाही नाहीत.

नवी मुंबईतील वाढती वाहन संख्या पाहता चालताना प्रचंड अडथळे निर्माण होत होते. पदपथावर करण्यात आलेल्या दुचाकी पार्किंग, उखडलेले पदपथ, अपंग व्यक्तींना चालताना त्रास होणे, व्हीलचेअर असेल तर रस्त्या शिवाय पर्याय नाही असा अनेक अडचणी होत्या. मात्र तत्कालीन आयुक्त रामास्वामी  यांनी पहिल्यांदाच “वॉकेबिलिटी” हा उप्रकम हाती घेतला. त्यानुसार सुमारे कोठून कोठेही एक दिड किलोमीटर जायचे असेल तर निर्विघ्न जाता यावे यासाठीचा विचार करण्यात आला. यासाठी व्हीलचेअर सहज पदपथावरून चढणे उतरण्यासाठी उतार करणे, सर्वच पदपथ सुस्थितीत करणे, वाहने पदपथावर पार्किंग होऊ नये म्हणून शहरात सर्वत्र पदपथाला संरक्षक गज (ग्रील) बसवणे, चालताना दिशादर्शक , आणि रस्ते नामफलक डोक्याला लागू नये याची काळजी घेणे आदी सर्व उपाययोजना करण्यात आल्या. मात्र नव्याचे नऊ दिवस संपताच या उपक्रमाचे तीन तेरा वाजले आहेत.

आणखी वाचा- नवी मुंबई : मालमत्ता थकबाकी असणाऱ्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसचा इशारा, १५ मार्चपासून कडक कारवाई

पदपथावर दुचाकी पार्किंग होऊ नये यासाठी लागण्यात आलेले ग्रील मोक्याच्या जागी तोडण्यात आले, पदपथ उखडले गेले कायम तात्पुरती डागडुजीवरच भर (अर्थपूर्ण?)  देण्यात आला. या शिवाय सोसायटी गेट समोर पार्किंग केल्यावर पादचाऱ्यांना होणारा त्रास सर्वाधिक सुरु झाला. अशी अवस्था सर्वच शहरात कमी अधिक प्रमाणात झाली आहे. फक्त वाशी नोडमध्ये त्या मानाने चांगली व्यवस्था टिकून आहे. मात्र तेथेही ग्रील अनेक ठिकाणी ग्रील तोडण्यात आलेले आहेतच. या शिवाय नव्याने लावण्यात आलेल्या पदपथावरील नाम फलकाची उंची कमी अधिक करण्यात आल्याने अनेक ठिकाणी चालताना हे फलक डोक्याला लागतात.

आणखी वाचा- नवी मुंबई : चेहरा धुताना अंगावर पाणी उडाल्याने व्यक्तीवर कटरने वार

गँरेज सर्वात मोठी डोकेदुखी

नवी मुंबईत कोपरखैरणे तीन टाकी परिसार, वाशी सेक्टर १७,  एपीएमसी , सीबीडी, नेरूळ समाधान चौक, ऐरोली अनेक ठिकाणी दुचाकी गाड्यांचे  गँरेज आणि चारचाकी गाड्यांना शोभिवंत बनवणारी दुकाने मोठी अडचण ठरत असून या ठिकाणाहून चालता येताच नाही. ही बाब वाहतूक विभागही मान्य करतो. अनेकदा कारवाई केली जाते ठोस कारवाई आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते विकास सोरटे यांनी दिली.

आणखी वाचा- नवी मुंबई : आता तरी वेगावर नियंत्रण येणार का? वजरानी चौकातील अपघातग्रस्त प्रदर्शनीय गाडी वेधतेय लक्ष

पदपथावर आणि पदपथावर चढताना उतरताना सर्वात मोती अडचण दुचाकीची अनधिकृत पार्किंग ठरत आहे. यात गँरेज सुद्धा अडथळा करणारा घटक आहे. याचा सर्व अभ्यास करून आम्ही कारवाई सुरु केलेली आहे. अशी परिस्थिती जर कोणाला आढळून आली तर वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणून सहकार्य करावे. कारवाई लगेच केली जाईल.
-तिरुपती काकडे (उपायुक्त वाहतूक विभाग)

नवी मुंबईत खास करून कोपरखैरणे, घणसोली भागातील पदपथ दुरुस्ती आवश्यक आहे. या बाबत सर्वेक्षण करून शक्य तेवढ्या लवकर ही दुरुस्ती केली जाईल.
-संजय देसाई (शहर अभियंता)

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Walkability scheme is not working properly in all over navi mumbai mumbai print news mrj