नवी मुंबई: नवी मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी देण्यात येणाऱ्या भूखंडावरून स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्यातच संघर्ष सुरु झाला आहे. तीन दिवस मैदान बचाव आंदोलन केल्या नंतर आता लवकरच आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे. अशी माहिती फोर्टी प्लस संघटनेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नवी मुंबई: कांदळवन कत्तली प्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल

नवी मुंबईतील सेक्टर १५ सीबीडी बेलापूर येथे आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नातून वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी भूखंड मंजूर झाला या भूखंडापोटी सुरवातीला नवी मुंबई मनपाने १०७ कोटी रुपये देण्याची नियोजित होते. या बाबतही म्हात्रे यांनी प्रयत्न करून ६० कोटी रुपये सवलत मिळवली असा दावा म्हात्रे यांनी केला त्यामुळे रुग्णालय दृष्टीक्षेपात आल्याचे दिसत असतानाच याच मैदानावर अनेक वर्षांपासून ४० प्लस क्रिकेट सामने भरवणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन हत्यार उपसले तीन दिवस आंदोलन केल्या नंतर आंदोलनाही पुढील दिशा ठरवण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. नवी मुंबईतील बेलापूर येथील मैदान वाचविण्यासाठी फोर्टी प्लस मास्टर्स क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू, स्थानिक प्रकल्पग्रस्त, शहरातील क्रीडाप्रेमी आणि पर्यावरण प्रेमिंनी पुढाकार घेतला होता.

हेही वाचा >>> नवी मुंबईमध्ये गोवरचे २४ रुग्ण; शहराला धोका नसल्याची महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती

बेलापूरचे हे मैदान खेळासाठी राखीव ठेवले नाही तर त्यासाठी तीव्र जन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी खेळाडूंनी दिला. या मैदानावर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज बांधण्याचा घाट स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनी घातला असून हा दुराग्रह त्यांनी मागे घेतला नाही तर मैदानासाठी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण तसेच आत्मदहन करण्याची देखील आमची तयारी असल्याची प्रतिक्रिया आयोजित पत्रकार परिषदेत प्रकल्पग्रस्थान्नी व्यक्त केले. तसेच हेच मैदान खेळासाठीच असावे असे पात्र २०१५ साली म्हात्रे यांनी सिडकोला दिले होते मग अचानक युटर्न का मारला,?महाविद्यालयास अन्यत्र जागा असताना हाच भूखंड अट्टाहास का ?, सिडकोने शहराबाहेर अनेक ठिकाणी सामाजिक कामांना मोफत भूखंड दिले मग यासाठी पैसे द्यायचे असे काही प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आले   विकास मोकल (फोर्टी प्लस मास्टर्स क्रिकेट असोसिएशन) या मैदानावर कुठलेही व्यवायिक सामने घेतले जात नाहीत केवळ हौशी सामने आयोजित केले जातात. रुग्णालयास विरोध नाही मात्र  चाळीशी पार झालेले ३ हजार येथील क्रिकेट सामन्यात सहभागी होतात. शिवाय अन्यत्र भूखंड असताना याच भूखंडाचा हट्ट का? या बाबत मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांनाही आमची भूमिकेविषयी निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warning of hunger strike against local mla manda mhatre to save maidan ysh