या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रात्रीच्या वेळी रहिवाशांकडून मोकळ्या भूखंडांवर कचरा

कोपरखैरणे नोडमध्ये अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या बांधकामातील टाकाऊ साहित्य सध्या पदपथावर तसेच रस्त्यांच्या कोपऱ्यावर टाकण्यात येत आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनेक भागांत घरातील डागडुजीची कामे सुरू आहेत. रात्रीच्या वेळेस रहिवासी सिमेंटच्या गोणीत बांधकामातील टाकाऊ साहित्य भरून त्या रस्त्याकडेला फेकून देत आहेत. यातील काही टाकाऊ साहित्य कचराकुंडय़ा आणि पदपथावर टाकले जात आहे. मात्र या साऱ्या प्रकाराकडे भरारी पथकाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे टाकाऊ साहित्य टाकण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. छोटय़ा टेम्पोमधूनही बांधकामातील टाकाऊ साहित्य टाकले जात आहे. याबाबत विभाग अधिकारी अशोक मडवी यांना विचारणा केली असता त्यांनी बांधकामातील टाकाऊ साहित्य टाकण्यास मनाई करणारे पथक नोडमधील अंतर्गत भागांत फिरत नाहीत. गृहसंस्थांच्या आवाराबाहेर वा बैठय़ा घराच्या बाहेर टाकाऊ साहित्य पडले असल्यास त्यांना नोटीस देत असल्याचे सांगितले.

बांधकामातील टाकाऊ साहित्य टाकणाऱ्यांवर पथकामार्फतच नजर ठेवणे गरजेचे आहे, ते आम्ही करून घेऊ, मात्र टाकाऊ साहित्य कोणी टाकले याचा पत्ता लागत नसल्याने त्यावर दंडआकारणी होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.कोपरखैरणे भागात बांधकामातील टाकाऊ साहित्य संतोषीमाता मैदान, खाडीकिनारा, घणसोली-कोपरखैरणेदरम्यान असलेला नाला, घणसोली पाम बीच रस्त्याकडेला टाकला जातो, असे रहिवासी हेमंत पाटील यांनी सांगितले.