पनवेल : खारघर उपनगरात भर पावसातही पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने उपनगराला खेटून असणाऱ्या ओवेकॅम्प या गावातील प्रत्येक घरासमोर पाणी साठविण्यासाठी २०० लिटर प्लास्टीकचे पिंप घराच्या प्रवेशव्दारावर उभी करून ठेवल्याचे दिसून येते. या गावऱ्यांच्या नळांना सिडको महामंडळाचे पाणी दोन दिवसातून एकदा येते. त्यामुळे पावसाचे पाणी प्लास्टिकच्या पिंपामध्ये साठवण्यासाठी अशी पिंप घराबाहेर ठेवली जात आहेत.

सध्या ओवे कॅम्पमधील गावकरी घराच्या छतावरुन पडणारे पावसाचे पाणी या पिंपात साठवून त्यांचे दिवसाचे पाणी व्यवस्थापन करतात. विशेष म्हणजे याच ओवेकॅम्प गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या हक्काची जागा कोयना धरणासाठी राज्य सरकारला दिल्यावर त्यांचे खारघर येथे पुनर्वसन करण्यात आले. त्याच गावकऱ्यांना या पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. 

Panvel Minor Girl Molested by rickshaw driver Marathi News
Panvel Minor Girl Molested : पनवेलमध्ये रिक्षाचालकाकडून ओळखीच्या बालिकेवर अत्याचार
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Morbe Dam of the Navi Mumbai Municipal Corporation was filled to the brim
नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण काठोकाठ भरले!
Administration struggles to fill potholes before Chief Ministers visit to Mumbai Goa highway
मुख्यमंत्र्यांच्या मुंबई गोवा महामार्ग दौऱ्यापूर्वी खड्डे भरण्यासाठी प्रशासनाची धडपड
Atal Setu Viral Video
Atal Setu Viral Video : अटल सेतूवर थरार; रेलिंगच्या पलिकडे उतरलेल्या महिलेला पोलिसांनी वाचवलं, जबानीत म्हणाली, “मी तर…”
Navi Mumbai, vehicle repair,
नवी मुंबई : वाहन दुरुस्ती, सुटे भाग विक्री दुकानदारांवर धडक कारवाई
navi mumbai corporation, Morbe Dam,
मोरबे धरण ९३ टक्के भरले
Ganesh Naiks talk about increased water planning after Jalpuja of Morbe Dam
“भिरा प्रकल्पाचे पाणी आणा”, मोरबे धरणाच्या जलपूजनानंतर नाईक यांचे वाढीव पाणी नियोजनाचे सूतोवाच

आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांच्या मुंबई गोवा महामार्ग दौऱ्यापूर्वी खड्डे भरण्यासाठी प्रशासनाची धडपड

ओवे कॅम्प या गावाची लोकसंख्या दोन हजारांवर पोहचली आहे. भाडेकरुंची संख्या या गावात मोठी आहे. खारघर उपनगरातील कामगारवर्ग याच गावात राहतो. या गावात राहणारे ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त झालेले श्रीरंग भातोसे यांनी दिलेल्या माहितीनुसार १९६१ साली ओवे कॅम्पवासियांना खारघरनजीक पुनर्वसित म्हणून राज्य सरकारने वसवले. मात्र सध्या या गावात सर्वात मोठी समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. सिडको मंडळाने या गावाचे अद्याप हस्तांतरण न केल्याने पनवेल महापालिका व सिडको मंडळ यांच्या प्रशासकीय वादामुळे या गावाला पुरेसे पाणी मिळू शकले नाही. ६३ वर्षांपासून हे गावकरी येथे राहत असले तरी प्रशासनाला या गावकऱ्यांना पुरेसे पाणी पुरवठा करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करावी असे वाटत नसल्याने येथील महिला ग्रामस्थ संताप व्यक्त करतात.

गावात सध्या असणाऱ्या जलकुंभातून होणारा  पाणीपुरवठा अपुरा असल्याने दोन दिवसाआड पाणी ग्रामस्थांना मिळत आहे. खारघर हे नवी मुंबईतील सर्वात स्मार्ट शहर म्हणून ओळखले जात असले तरी येथील मूळनिवासी तहानेने व्याकुळ झाले आहेत. सिडको मंडळाचे उच्चपदस्थ अधिकारी खारघर परिसरात देशातील सर्वोत्तम प्रकल्प आणून शहर सुंदर व आकर्षक बनविण्याकडे कल ठेवतात. मात्र पिण्याचे पाणी नसलेल्या शहरवासियांची समस्या कायमची मिटविण्यासाठी तळमळीने पाठपुरावा करणारे अधिकारी दिसत नसल्याने ग्रामस्थ संतापले आहेत.  

आणखी वाचा-Panvel Minor Girl Molested : पनवेलमध्ये रिक्षाचालकाकडून ओळखीच्या बालिकेवर अत्याचार

महाराष्ट्र राज्याच्या पाणी व्यवस्थापना करता कोयना प्रकल्पग्रस्त विस्थापित , खारघर येथील ओवे कॅम्प मध्ये पन्नास वर्षांपूर्वी पुनर्वसन केले होते. मात्र याच रहिवाशांना गावांमध्ये दोन दोन दिवस पाणी मिळत नसून,किमान दीड लाख लिटरची जलवाहिनी सिडकोने येथे उभारावी अशी मागणी शिवसेनेने सिडको मंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. -मंगेश रानवडे, महानगर संघटक, शिवसेना (शिंदे गट)

सिडकोच्या पाणी पुरवठा विभागातील अभियंत्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनूसार पनवेल महापालिकेकडे गावांची जबाबदारी असून गावांमध्ये जलवाहिनी, जलकुंभ उभारणे हे काम महापालिका करत. ओवे कॅम्प या गावामध्ये सुद्धा अंतर्गत पाणी पुरवठा पनवेल महापालिकेकडून होत असला तरी सिडको सद्यस्थितीमध्ये गावाच्या मुख्य जलवाहिनीपर्यंत पाणी पुरवठा करते. ग्रामस्थांच्या मागणीनंतर पनवेल महापालिकेने या गावासाठी पाण्याची टाकी बसविली असून दररोज सिडकोकडून पुरेसा पाणी पुरवठा या गावात केल्याचा दावा सिडकोच्या अभियंत्याने केला आहे.  ग्रामस्थांच्या मागणीनंतर मोठ्या व्यासाची जलवाहिनी सिडकोने गावात दिली आहे. पनवेल महापालिका व सिडको यांच्या संयुक्त पथकाने गावाची लोकसंख्या नेमकी किती, त्यानंतर पाण्याची मागणी व वापर यानंतर कायम स्वरुपी पाणी प्रश्नावर मार्ग काढता येईल असेही स्पष्ट केले.