सीमा भोईर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेलमधील झोपडपट्टीवासीयांची वणवण

पाताळगंगा नदी आणि हेटवणे धरणातून येणाऱ्या जलवाहिनीतून दिवसाला साडेतीन लाख लिटर पाणी चोरी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली असतानाही पालिका प्रशासन शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असल्याचा दावा ‘लोकसत्ता’ने शहरातील झोपडपट्टी परिसरात केलेल्या पाहणीत फोल ठरला आहे. काही परिसरात काही दिवसांपासून दोन ते तीन दिवसांनी पाणी येते आणि तेही अर्धा तासच असल्याने झोपडपट्टीवासीयांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

पनवेल शहरातील नवनाथ नगर, मालधक्का, भगत चाळ, आझाद नगर परिसरात पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना मिळेल त्या मार्गाने पाणी मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. घरातील लहान मुलांसहित वयोवृद्धही पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत.  पनवेल स्टेशनजवळच जलवाहिनी फुटल्याने खड्डय़ात साठलेल्या पाण्यात महिला कपडे धुतात. त्यांनी सांगितले की, दोन तीन दिवसाआड पाणी येत. ते अवघ्या अध्र्या तासासाठी सोडलं जातं. तोही नियमित नसल्याने पाण्याचा काहीही भरवसा नसतो. हे पाणी आले की कसेबसे पिण्याचे पाणी भरतो. वापरासाठी लागणारे पाणी पाण्याच्या टाकीखालील खड्डय़ातून भरतो. अगदीच पाणी नाही आले तर पिण्याचे पाणी भरण्यासाठी पनवेल स्टेशनवर जातो. बरेचदा पोलीस पिटाळून लावतात. त्यामुळे आम्ही मजबुरीने खड्डय़ातीलही पाणी पितो. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी नळ जोडणीसाठी पालिकेत अर्ज केला आहे. आज सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला पण अजूनही आम्हाला जोडणी मिळाली नाही. नळ जोडणीसाठी लागणारे २० हजार रुपये नसल्यामुळे अनेकांनी जोडणीच घ्ेतलेली नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे नळ आहे त्यांना महिना अडीचशे रुपये देऊन त्यांच्याकडून पाणी भरले जाते. मात्र त्यांच्याकडेही येणारे पाणी कमी असल्यामुळे केवळ एक-दोन हंडेच पाणी मिळते.