नवी मुंबई : महापे ते शिळ या १२०० मी.मी. व्यासाच्या पाईपलाईनवर अडवली येथे लिकेज झाल्यामुळे ऐरोली व घणसोली या विभागात सकाळचा सप्लाय व्यवस्थित झालेला नाही. तरी या भागात संध्याकाळचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी बेलापूर ते कोपरखैरणे मुख्य जलवाहिनीवरील सर्व वॉल २ तास उशिराने चालू होतील. त्यामुळे बेलापूर ते दिघा या सर्वच विभागात आज संध्याकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी लोकसत्ताला दिली.
हेही वाचा – जेएनपीए बंदर परिसरात वाहनातील डिझेल चोरांचा सुळसुळाट, चालकांनी डिझेल चोरांना पकडले
हेही वाचा – पनवेल बस आगारात उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांसाठी दंडुक्याचा उतारा
नवी मुंबई शहरात सातत्याने पाणी गळतीचा प्रश्न निर्माण झाला असून त्यामुळे नागरिकांना मात्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे आणि पावसाळ्यात सातत्याने होणाऱ्या कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे नवी मुंबईकर मात्र त्रस्त झाले आहेत.