लोकसत्ता टीम

उरण : उरण खारकोपर दरम्यानची लोकल सुरू होण्यापूर्वीच उरण स्थानकांच्या भुयारी मार्गात पाणी साचू लागले आहे. हे पाणी काढण्यासाठी कायमस्वरूपी पंप ठेवण्याची तरतुद रेल्वेला करावी लागली आहे. त्यामुळे उरण स्थानकांच्या भुयारी मार्गातील पाणी समस्या कायम आहे.

खारकोपर ते उरण ही बहुप्रतिक्षित लोकल सुरू होण्यापूर्वीच उरणच्या स्थानकाच्या भुयारी मार्गात पावसामुळे पाणी साचू लागले आहे. त्यामुळे ही लोकल सुरू होण्यापूर्वीच या मार्गावरील स्थानकांच्या कामांची पोलखोल झाली आहे. खाडी परिसरात असलेल्या या स्थानकात भुयारी फलाट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचे व समुद्राच्या भरतीचे पाणी स्थानकांच्या भुयारी मार्गात येऊ लागले असल्याचे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तर उरण मधील तरुणांनी स्थानकात साचलेल्या या पाण्यात डुंबून पोहण्याचा आनंद घेतला होता. त्याचप्रमाणे महिलांनी लोकल सुरू होण्यासाठी स्थानकात कब अवोगे सारखी गाणी गात लोकल सुरू करण्याची मागणी केली होती.

आणखी वाचा-आज मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशातच उरण लोकल सुरू होण्याची येथील नागरीक वाट पाहत आहेत. त्यातच यासाठी तारीख पे तारीख ही जाहीर झाल्या आहेत. त्याचवेळी पहिल्याच पावसात नव्याने उभारण्यात आलेल्या स्थानकांत चार ते पाच फूट पाणी साचल्याने पावसाळ्यात या स्थानकांची स्थिती काय असणार याचे भविष्यच दिसू लागले आहे. पावसाचे पाणी भुयारी मार्गात साचू लागल्याने या स्थानकातील दोन्ही भुयारी मार्ग लोखंडी बार लावून बंद करण्यात आले आहेत.