उरण : अतिवृष्टी व खवळलेल्या समुद्रामुळे मागील बारा दिवसापासून बंद असलेली उरण ते मुंबई दरम्यानची जलसेवा शनिवारी दुपारी (२ वाजल्या पासून) सुरु झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
दुपारी २ वाजता मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून पहिली बोट सोडण्यात आली. त्यानंतर ३ वाजल्यापासून मोरा बंदरातून प्रवासी बोटी दर तासाला नियमित करण्यात आल्या आहेत.शनिवारी दुपारी हवामान विभागाने समुद्रातील जलवाहतुकीसाठी धोक्याचा इशारा देणारा बावटा उतरविल्याने मुंबई मोरा जलसेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती मोरा बंदराचे अधिकारी नितीन कोळी यांनी दिली आहे.