उरण : हवामान विभागाने खराब हवामान व चक्रीवादळाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शुक्रवार पासून खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई ते गेटवे- एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का, जेएनपीटी या सागरी मार्गावरील प्रवासीसेवा तत्पुर्वी बंद करण्यात आली आहे.अरबी समुद्रात हवामानात बदल झाले आहेत. समुद्रातील पिरजोय वादळामुळे धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळल्याने समुद्र खवळला आहे. इशाऱ्यामुळे प्रवासी वाहतूक बंद केली असल्याची माहिती मुंबई गेटवे जलवाहतूक संघटनेचे सेक्रेटरी मामु मुल्ला आणि घारापुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.
उरण : चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे जलसेवा बंद, खवळलेला समुद्र शांत झाल्यानंतर सेवा पूर्ववत होणार
शुक्रवार पासून खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई ते गेटवे- एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का, जेएनपीटी या सागरी मार्गावरील प्रवासीसेवा तत्पुर्वी बंद करण्यात आली आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 10-06-2023 at 21:53 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water service suspended due to cyclone warning ysh