उरण : हवामान विभागाने खराब हवामान व चक्रीवादळाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शुक्रवार पासून खबरदारीची  उपाययोजना म्हणून मुंबई ते गेटवे- एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का, जेएनपीटी या सागरी मार्गावरील प्रवासीसेवा तत्पुर्वी बंद करण्यात आली आहे.अरबी समुद्रात हवामानात बदल झाले आहेत. समुद्रातील पिरजोय वादळामुळे  धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळल्याने समुद्र खवळला आहे. इशाऱ्यामुळे प्रवासी वाहतूक बंद केली असल्याची माहिती मुंबई गेटवे जलवाहतूक संघटनेचे सेक्रेटरी मामु मुल्ला आणि घारापुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा