उरण : हवामान विभागाने समुद्रात खराब हवामान व अतिवृष्टीचा अंदाज दिला आहे. त्यासाठी जलवाहतुकीला इशारा देणारा लाल बावटा लावला आहे. त्यामुळे उरणमधील जलसेवा मागील सहा दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे. याचा फटका या मार्गावरील प्रवासी व चाकरमानी यांना बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रवाशांना रस्ते मार्गाने लांबचा व वाहतूक कोंडीचा सामना करीत प्रवास करावा लागत आहे. उरणमधील जलसेवा बुधवारपासून (१९ जुलै) बंद आहे. तर वातावरण बदल होऊ लागला असून कदाचित सोमवार सायंकाळपर्यंत ही सेवा सुरू होण्याची शक्यता बंदर विभागाकडून व्यक्त केली जात आहे. उरण येथून मोरा, जेएनपीटी व करंजा या तीन बंदरातून ही सेवा आहे. यामध्ये मोरा ते मुंबई, जेएनपीटी ते मुंबई व करंजा ते रेवस (अलिबाग) या जलमार्गाने पावसाळ्यात जलसेवा सुरू असते. अतिवृष्टी व खराब हवामानामुळे समुद्र खवळला आहे. त्यामुळे हवामान विभागाने धोक्याच्या इशारा दिल्याने मोरा ते मुंबई (भाऊचा धक्का) ही जलसेवा बंद करण्यात आल्याची माहिती मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली आहे.

हेही वाचा – एक पोस्टकार्ड मणिपूरसाठी, महिला भगिनींसाठी; नवी मुंबईकरांची राष्ट्रपतींना हाक

हेही वाचा – कोपरखैरणे पोलिसांनी तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत ३ सराईत आरोपींना केले जेरबंद, ७ गुन्हे उकल, पाणी मीटर चोरही अटकेत 

करंजा रेवस जलसेवा सुरू

उरणमधील करंजा व अलिबागच्या रेवस दरम्यानची जलसेवा सोमवारी सुरू करण्यात आली आहे. मात्र वातावरणातील बदलानुसार ही सेवा सुरू राहणार आहे.