नवी मुंबई: बारवी गुरुत्व वाहिन्या कार्यान्वीत करण्याचे तातडीचे काम हाती घेतल्यामुळे शुक्रवार, (दि. २४/०३/२०२३) दुपारी १२.०० वा. ते शनिवारी (दि. २५/०३/२०२३) दुपारी १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद राहील. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका(गावठाण भाग तसेच एमआयडीसीतील सर्व गावे झोपडपट्टी भाग) मिराभाईंदर महानगरपालिका, टी. टी. सी. औद्योगिक क्षेत्र, वागळे औद्योगिक क्षेत्र यांचा पाणी पुरवठा बंद राहील.
आणखी वाचा- बाजारात भाज्यांची दरवाढ
पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढे काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. संबंधित महानगरपालिका, ग्रामपंचायती, उद्योजक यांना सदर पाणी कपातीच्या कालावधीत सहकार्य करण्याची .एमआयडीसीने विनंती आहे केली आहे. त्यामुळे बारवी धरणातून ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा होतो अशा सर्व घटकांना हि सूचना देण्यात आली असून या क्षेत्रातील कारखाने, व्यावसायिक, आद्योगिक रहिवासी पाणी वापर करणार्यांनी पाणी साठा ठेवावा व पाणी जपून वापरावे अशी विनंती कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या द्वारा करण्यात आली आहे.