नवी मुंबई: राज्याच्या अनेक भागांत आतापासूनच पाण्याची ओरड सुरू असताना शहरात मात्र बेलापूर ते दिघा विभागांत बेकायदा नळजोडण्या आहेत. याबाबत आज बुधवारी पालिका शहर अभियंता विभागामार्फत बैठक घेतली जाणार असून प्रत्येक विभागात बेकायदा नळजोडण्या शोधून त्या खंडित करण्याबाबतचे नियोजन बुधवारी होणाऱ्या बैठकीत केले जाणार आहे. त्यामुळे लवकरच शहरात बेकायदा नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम राबवली जाणार आहे.
शहरात अद्यापही काही भागांत पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे. शहरात परिमंडळ २ मध्ये व्यवस्थित पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे शहरात बेकायदा नळजोडण्या करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा… अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे पडले महागात; जेष्ठ नागरिकांनो सांभाळून चला…
शहर अभियंता ते विभाग स्तरावर पालिकेच्या उपअभियंता व ठेकेदार यांची माणसे नियंत्रण करण्यासाठी असतानाही बेकायदा नळजोडण्या कोणाच्या संगनमताने व आशीर्वादाने होतात असा प्रश्न पडला आहे. मागील वर्षीही पालिकेने एक ते दीड महिन्यांत शहरात तब्बल ४२२ बेकायदा नळजोडण्या पालिकेने खंडीत केल्या होत्या. तसेच मोठ्या प्रमाणात लाखोंचा दंड वसूल केला होता. परंतु दंडापेक्षा बेकायदा नळजोडण्या होऊच नये यासाठी पाणीचोरी करणारे झारीतले शुक्राचार्य कोण याचाच शोध पालिका प्रशासनाने घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महापालिका याबाबत गांभीर्याने तोडक कारवाई करण्याची मोहीम राबवणार आहे.
शहरात सर्वाधिक बेकायदा नळजोडण्या परिमंडळ २ मध्ये सापडल्या होत्या. बेकायदा नळजोडण्या होऊ च नयेत यासाठी पालिका आयुक्तांनी संबंधितांना जाब विचारण्याची गरज आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एमआयडीसीकडून होणारा पुरवठा पूर्ण क्षमतेने होत नाही. तो मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे. शहरात होणाऱ्या बोकायदा नळजोडण्याबाबत पालिका तोडक मोहीम राबवणार असून त्यासाठीच बुधवारी पालिका मुख्यालयात शहर अभियंता व पाणीपुरवठा विभाग यांची बैठक होणार असून बेकायदा खंडित करण्याबाबत मोहीम राबवण्याचे वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे. – संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई.