पाणी जपून वापरण्याचे आवाहन

नवी मुंबई-  नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखले  येथील पनवेल कर्जत येथील दुहेरी रेल्वे मार्गाकरीता जलवाहिनी स्थलांतरीत करणे व  कळंबोली येथे एक्सप्रेस पुलाकाळी दिवा पनवेल रेल्वे मार्गावरील लाईन क्रॉसिंग करुन जलवाहीनी टाकण्यासाठीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यालाही अनुदान देण्याची मागणी

kalyan Dombivli firecracker shop
कल्याण-डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यांवरील फटाक्यांचे मंच हटवा, प्रवाशांसह वाहन चालकांची मागणी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
air quality deteriorated in pune city due to diwali firecracker
शहरभर फटाक्यांची तुफान आतषबाजी… हवेची गुणवत्ता खालावली…
new method developed to find out connection between building material and temperatures
बांधकाम साहित्य आणि तापमानांचा संबंध शोधणारी नवी पद्धत विकसित, काय आहे पद्धती वाचा…
This year almost all tours during Diwali holidays have house full registration
दिवाळीच्या सुट्टीत सर्वच टूर्स कंपन्यांसाठी ‘हाऊसफुल’ नोंदणी
civic problem in vadgaon sheri assembly constituency
अपुरा पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी कोणत्या मतदारसंघात आहेत या समस्या !
pmc appealed pune residents to celebrate eco friendly diwali
दिवाळी अशी करा साजरी, महापालिकेने का केले हे आवाहन

त्याचप्रमाणे भोकरपाडा येथील जलशुद्दीकरण केंद्र ,मोरबे धरण ते दिघा  या मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची महत्वाची कामे करणे अत्यावश्यक असल्याने सोमवारी सकाळी १० ते मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत  भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा २४ तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या देखभालीच्या कामामुळे मंगळवारी संध्याकाळीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरीकांनी या दोन दिवसात पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे.

देखभाल दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामामुळे सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी सकाळी पाणीपुरवठा बंद राहणार असून मंगळवारीही संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने  नागरीकांनी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा व पालिकेला सहकार्य करावे.

अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता ,मोरबे प्रकल्प