चिरनेर परिसरातील नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या हेटवणे जलवाहिनीला मंगळवारी डंपर ने धडक दिल्याने जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे काही तासातच हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. तसेच येथील आदिवासी पाड्याला होणार वीज पुरवठाही खंडीत झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- रायगड : जेएनपीटी – पळस्पे राष्ट्रीय महामार्गावर दोन डंपरच्या धडकेत चालकाचा मृत्यू

या अपघातानंतर पेण येथील हेटवणे पाणी पुरवठा केंद्रातून पाणी बंद करण्यात आले आहे. परिणामी नवी मुंबईतील पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता मातीने भरलेला डंपर चिरनेर – खारपाडा रोडवरील तलाखराच्या खिंडीत उजव्या बाजूला कोसळला. या धडकेत विजेचा पोल उडवून रस्त्याच्या बाजूला हेटवणे जलवाहिनीवर आदल्याने गळती लागली आहे. हेटवणे जल वहिनीला गळती लागली असून त्याची दुरुस्ती हाती घेतली आहे. त्यामुळे लवकरच पाणी पुरवठा सुरळीत सुरू होईल अशी माहिती जलपुरवठा विभागाचे अधिकारी प्रीतिश ठाकूर यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply in navi mumbai stopped due to leakage in hetwane water channel in chirner area dpj