नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा १२ तास बंद ठेवण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा-नवी मुंबई : लिडार सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा महापालिकेचा दावा

शुक्रवारी संध्याकाळी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच कामोठे, खारघर नोडमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारीही कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे पालिका क्षेत्रातील व कामोठे, खारघर नोडमधील नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply off tomorrow evening in navi mumbai mrj