नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत बुधवारी २८ डिसेंबर रोजी मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर कामे करण्यात येणार आहेत.त्यामुळे बुधवारी सकाळी ८ ते सायंकाळी ८ यावेळेत हे काम करण्यात येत असल्याने बुधवारी शहरात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नवी मुंबई: नाताळच्या पार्श्वभूमीवर गीतनृत्यात्मक ‘फ्लॅश मॉब’द्वारे स्वच्छता संदेश

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली व दिघा या विभागात बुधवारी सायंकाळी पाणीपुरवठा होणार नसून गुरुवारी सकाळी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन शहर अभियंता संजय देसाई यांनी  केले आहे.