पनवेल ः हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनीवर शुक्रवार ते शनिवारपर्यंत पुढील २४ तास दुरुस्तीचे काम सिडको महामंडळाने हाती घेतल्याने खारघर, तळोजा व उलवे या वसाहतींसह जेएनपीटी व द्रोणागिरी या परिसराला पाणी पुरवठा होणार नसल्याचे सिडकोने कळविले आहे.
हेही वाचा – शशिकांत शिंदे सातारा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार….
हेही वाचा – पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
तसेच पुन्हा नव्याने जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरु होण्यासाठी अजून २४ तास लागणार असल्याचे सिडको मंडळाने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकात कळविले आहे. नागरिकांनी या काळात पाणी जपून वापरावे असे आवाहन सिडको मंडळातर्फे करण्यात आले आहे. उन्हाळ्यात घरात पाणी नसल्याने सुमारे ७ लाख नागरिकांना पाण्याशिवाय दोन दिवस रहावे लागणार आहे.