नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात स्वतःच्या मालकीच्या मोरबे धरणामुळे नवी मुंबईतील नागरीकांना कोणत्याही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत नाही. परंतू दुसरीकडे शेजारीच असलेल्या पनवेल महापालिकाक्षेत्रातील नागीरिकांना मात्र पाणीटंचाईमुळे द्राविडीप्राणायाम करावे लागत असल्याचे चित्र अनेक वेळा पाहायला मिळते.जलसंपन्न असलेल्या या शहरात मूळ गावठाणात वाढलेली घरे,तसेच झोपडपट्टी भागात वाढलेल्या झोपड्यांमध्ये पाण्याचा गैरवापर करण्यात येत होता. आता अशा फुकटच्या पाणीवापरावर निर्बंध येणार असून हे सर्वचजण पाणीमीटरच्या कक्षेत येणार आहेत. त्यामुळे फुकटच्या पाणीवापरावर कडक निर्बंध येणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महापालिका क्षेत्रातील मुळ गावठाणे मोठ्यापटीत वाढलेली आहेत.तर झोपडपट्टी यांच्यामध्येही सातत्याने वाढ होत आहे.त्यामुळे मूळ गावठाणांमध्ये आता एका घराच्या जागेवर मोठ्या इमारती झाल्या,त्यामध्ये अनेक खोल्या तयार करुन भाड्याने दिल्याचे चित्र आहे.परंतू मूळ घरासाठी घेतलेल्या एकाच नळजोडणीवर अनेक घरांना पाणीपुरवठा केला जात होता.याच प्रकारे झोपडपट्ट्यांमध्येही अनेक झोपडपट्ट्या वाढल्या, रहिवाशी वाढले पण पाणी जोडणी न घेता फुकटात पाणी वापर तसेच पाणी चोरी असे प्रकार सुरु झाले. त्यामुळे पालिका फुकटात तसेच चोरी करुन पाणी वापरच १०० टक्के बंद करुन पाणी वापर करणारा प्रत्येकजन पाणीमीटरच्या कक्षेत येणार आहे.२०११च्या आधीच्या झोपडपट्टी तसेच २०११च्यानंतर झालेल्या झोपडपट्ट्यांनाही ५ ते १५ घरे मिळून नळखांबद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे यापुढे नवी मुंबईत फुकटात पाणी वापरावर निर्बंध येणार असून प्रत्येक पाणीवापर करणारा नागरीक पाणीबिलाच्या कक्षेत येणार आहे..
हेही वाचा : वाशी टोल नाका की वाहतूक कोंडी नाका?; टोलनाक्यावरील १८ पैकी २ लेन बंद; वाहतूक कोंडीत भर
पालिका हद्दीत सध्या १,३५३४८ नळजोडणीधारक असून ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. निव्वळ गावठाणमध्येच ८ विभाग कार्यालयाअंतर्गत ४०४७२ पाणीपट्टीधारक वाढणार आहेत.नवी मुंबई शहरात मूळ गावठाणे व झोपडपट्ट्या यांना ५० रुपयात ३० हजार लिटर पाणी दिले जाते.तर सोसायट्यांना ४.७५ दराने १ हजार लिटर पाणी दिले जाते.वाणिज्य वापरासाठी ३० रु १ हजार लिटर पाण्यास तर सामाजिक संस्थाच्या वापरासाठी प्रतिहजार लीटरला ११ रुपये आकारणी घेतली जाते. नवी मुंबई महापालिकक्षेत्रातील पाणीपुरवठ्यासाठी वर्षाला कोट्यावधीचा खर्च येत असून.स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण असलेली नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका.मोरबे धरणाची प्रतिदिन चारशे पन्नास दशलक्षलिटर पाणीपुरवठा करण्याची क्षमता आहे.
तीस लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा होईल एवढी क्षमता मोरबे धरणाची आहे. भविष्याच्या पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीने पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के नागरीक पाणीबिलाच्या कक्षेत आणण्याचे लक्ष ठेवले आहे. नवी मुंबई शहरात यापुढे नियोजनबध्द पध्दतीने पाणीवाटप व पाणीआकारणी केली जाणार असून सर्वांना पाणीबिलआकारणीच्या कक्षेत आणले जाणार आहे .त्यादृष्टीने पालिकेने योग्य ते नियोजन केले आहे. पाणीवापर त्याच्याकडून पाणीबिल आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियांता संजय देसाई यांनी दिली.
हेही वाचा : नवी मुंबई : प्रारूप विकास आराखडा मागे घेण्याची सिडकोची सूचना
नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात प्रत्येकाला पाणी याप्रमाणे नियोजन करण्यात आले असून शहरात राहणारा प्रत्येक नागरीक पाणीबिलाच्या कक्षेत आणण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.तसेच झोपडपट्टी तसेच गावठाणे तसेच इतर ठिकाणी होणारा पाण्याचा वापर पाणीबिलाच्या कक्षेत येणार आहे. – अभिजीत बांगर, आयुक्त
आता विभागवार असलेले नळजोडणी धारक
बेलापूर- १४८४२
नेरुळ- १६६७८
वाशी- १६४७८
तुर्भे- १९४७४
कोपरखैरणे- १९८७१
घणसोली- १३०५३
ऐरोली- २०४७८
दिघा- १४४६५
नळजोडण्या….
शहरातील वाणिज्य वापर असलेल्या नळजोडण्या- ९६६९
घरगुती वापर असलेल्या नळजोडण्या- १,२५,१८५
संस्थात्मक नळजोडण्या- ४९४