लोकसत्ता प्रतिनिधी,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उरण : रानसई धरणाच्या उरण पनवेल मार्गालगत सिडको कार्यालय ते फुंडे स्थानक दरम्यानच्या जलवहिनीला शुक्रवारी सायंकाळी गळती लागली. ती शनिवारी ही सुरूच होती. यामुळे उरण पनवेल मार्गावर ऐन उन्हात वाहनचलकाना कारंज्याचा लाभ मिळत आहे. काही दिवसांपासून जलविहिनीच्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. वहिनीची सफाई केल्याने वेल्डींग ने बुजविण्यात आलेली छिद्रे मोकळी झाली असून पाच ते सहा ठिकाणी ही गळती लागलेली आहे.

या गळतीत रात्री पासून अनेक लिटर पाणी वाया गेले. मात्र काही वेळात याची माहिती एमआयडीसीला मिळताच शनिवारी सकाळी ११ वाजता ही जलवाहिनीचा प्रवाह बंद करण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात पाणी वाचले. ही गळती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली.

आणखी वाचा-उरण परिसरात गावदेवांच्या जत्रा सुरू

उरणमधील २५ ग्रामपंचायती आणि येथील औद्योगिक विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे नोव्हेंबर पासूनच आठवडयातील मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवसांची पाणी कपात सुरू आहे. त्यामुळे पाण्याची बचत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. असे असतांना एमआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे गळती लागून असलेल्या पाण्याचा अपव्यय होत आहे. या घटनेनंतर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र तत्परतेने एमआयडीसीने ही जलवाहिनीचा प्रवाह बंद करण्यात आले त्यामुळे पाणी वाचले.