पनवेल : तळोजा वसाहतीमधील प्रवेशव्दारावर दिवा पनवेल लोहमार्गाखाली भुयारी मार्ग वाहनांंची येजा करण्यासाठी बांधला आहे. मंगळवारी या भुयारी मार्गात पाणी साचल्याने तळोजावासियांनी आश्चर्य व्यक्त केले. पावसाळ्यात हा मार्ग पाण्याखाली जातो. मात्र हिवाळ्याच्या पहिल्याच आठवड्यात हे पाणी आले कुठून असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी एल्वीस डीलेनारेस यांनी याबाबत प्रसारमाध्यमांवर भुयारी मार्गात पाणी आले कुठून असा प्रश्न उपस्थित करणारी ध्वनीचित्रफीत पसरवून रेल्वे प्रशासन आणि सिडको महामंडळाचे लक्ष वेधले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… आता नवी मुंबईतही बार वाईन शॉप बंद झाल्यावर दारू विक्रेते फेरीवाले …..   

हेही वाचा… अन्यथा बेलापूर-पेणधर मेट्रोचे उद्घाटन आम्ही करु – कॉंग्रेस

तळोजा वसाहतीमध्ये येजा करण्यासाठी मुख्य प्रवेशव्दार म्हणून लोहमार्गाखालील भुयारी मार्गाचा सर्रास वापर केला जातो. वाहनचालकांसाठी हा मार्ग तातडीने खुला करण्यासाठी भाजपचे आ. प्रशांत ठाकूर यांना आंदोलन करावे लागले होते. रेल्वे प्रशासनाचे अभियंता त्या आंदोलनावेळी या पुलाचे काम अपुर्ण असल्याचे सांगून हा पुल वाहतूकीसाठी सूरु करत नव्हते. मात्र समुद्रसपाटीपासून 30 फुट खोलवर बांधलेला भुयारी मार्गात पाणी साचण्याचे प्रकार वेळोवेळी होत असल्याने वाहनांना अर्धा फुट ते तीन फुटाच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात हा भुयारी मार्ग पाण्याखालीच असतो. मात्र हिवाळ्याच्या पहिल्याच आठवड्यात या मार्गात पाणी साचल्याने रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पाणी साचल्याने या मार्गात अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waterlogged at the subway of taloja asj
Show comments