नोकरीच्या अमिषाने फसवणुकीचे दोन महिन्यांत तीन प्रकार उघडकीस
शेखर हंप्रस
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवी मुंबई : नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांना फसवणुकीचे प्रकार शहरात वाढत असून दोन महिन्यांत तीन मोठय़ा घटना उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे या बोगस कंपन्यांची कार्यालये ही शहरांतील मोठय़ा व्यावसायिक संकुलांत थाटली जात असल्याने अजिबात संशय येत नाही. वाशी, नेरूळसारख्या भागात काही महिन्यांसाठी ही कार्यालये थाटली जात असून काही दिवसांत ती बंद होत आहेत.
फसवणुकीच्या प्रकारांनंतर पोलिसांच्या हाती लागत आहेत ते येथे काम करणारे कार्यालयीन कर्मचारी, मात्र त्यांनाही याबाबत काही माहिती नसून त्यांच्याकडूनही बिनपगारी काम करून घेतले जात असल्याने त्यांचीही फसवणूक होत आहे.
काही दिवसांपूर्वी शिपिंग क्षेत्रात नोकरीचे आमिष दाखवून देशभरातील शेकडो बेरोजगारांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र यातील आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्याच ठिकाणी काम करणाऱ्या एका युवकास ऑल इंडिया सिफेर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी पकडून नेरूळ पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र प्रथमदर्शनी त्याचा या गुन्ह्य़ाशी संबंध आढळून आला नाही. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. असेच अनेक प्रकार शहरात यापूर्वीही उघडकीस आले आहेत.
नवी मुंबईत जेएनपीटीसारखे बंदर, बॉम्बे हायसारखी कायम कामगारांची गरज असणारे ठिकाणे आहेत. जेएनपीटीवरून विदेशात जाणाऱ्या मालवाहू जहाजावरही कामगार हवे असतात. याचाच गैरफायदा घेत बेरोजगारांची मोठी फसवणूक होत आहे.
अनेक फसवणुकीच्या प्रकारांत या बोगस कंपन्या वाशी स्टेशन परिसर, नेरूळ येथील बिराजदार चौकातील व्यावसायिक इमारतीत आपली आलिशान कार्यालये थाटत आहेत. यात नविको शिपिंग, ट्रान्सफॉर्म शीप मेनेजमेंट, ट्रायवे शिपिंग आणि सीमेन शीप मॅनेजमेंट आदी काही नावे समोर आली आहेत, असा दाव ऑल इंडिया सिफेर्स युनियन अध्यक्ष संजय पवार यांनी केला आहे. त्यामुळे या संकुलांत असलेल्या अशा कंपन्यांवर पोलिसांनी नजर ठेवली पाहिजे. याापूर्वीही कॅनडा व ऑस्ट्रेलियात नोकरीच्या आमिषापोटी फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई केली होती. आजही या परिसरात अशा बोगस अनेक कंपन्या कार्यरत असल्याचे पवार यांनी सांगितले.
पुराव्यांअभावी आरोपी मोकाट
आतापर्यंत अशा प्रकरणांत बहुतांश फसवणूक करणारे आरोपी हे दिल्ली स्थित असल्याचेही तपासात समोर आले आहे. मात्र त्यांना अटक करणे आव्हानात्मक आहे. आरोपी कसलाही पुरावा मागे ठेवत
नाहीत. नोव्हेंबर २०२० मध्ये दिपक सिन्हा याला अटक करण्यात आले होते. नवी मुंबईतून पळून गेल्यावर दोन वर्षांनी तो वडोदरा गुजरात येथील अतिश्रीमंत वसाहतीत राहत असल्याची खबर मिळताच त्याला अटक केले होते. त्याने एकटय़ानेच ५० पेक्षा अधिक लोकांची तब्बल १ कोटी ३ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केली होती.
बेरोजगारांची फसवणूक करणारे प्रकार खूप वाढत आहेत. त्यामुळे खात्री पटल्याशिवाय कुठेही पैसे देऊ नयेत. आरोपी पूर्ण योजनाबद्ध फसवणुकीचे काम करीत असल्याने आरोपींना पकडण्यास खूप तांत्रिक अडचणी येतात. व्यावसायिक इमारतीतील कार्यालय मालकांनीही आपण कोणाला जागा देतो याचे भान ठेवण्याची सामाजिक बांधिलकी जपावी.
-सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त