नेरुळ एनआरआय कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजूस नेरुळ सेक्टर ६० येथील डी व ई येथे मे. मिस्त्री कन्स्ट्रक्शन यांनी पालिकेची कोणतीही बांधकाम परवानगी घेतली नाही .त्यामुळे विनापरवाना सुरु असलेल्या कामाबाबत खुलासा सादर करावा अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे प्रकरण ५२ व ५३ अन्वये कारवाई करण्याचा इशारा लेखी पत्राद्वारे पालिकेने केला होता. याबाबत मे.मिस्त्री कन्स्ट्रक्शनकडून पालिकेला पत्रव्यवहार केला असून बांधकाम परवानगीबाबत सिडकोने परवानगी दिली असल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- उरणमधील पाणजे डोंगरी परिसरात कोल्ह्याचे दर्शन

तर दुसरीकडे पर्यावरण प्रेमींनी पालिकेची परवानगी नसताना करण्यात येत असलेल्या बांधकामाबाबत तोडक कारवाई करुन संबंधितावर एफआरआय दाखल करण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. आता पालिका व सिडको यांच्या अधिकारावरुनच अधिक वादंग वाढण्याची शक्यता आहेत.त्यामुळे एकीकडे विकास आराखड्यावरुन सुरु झालेल शीतशुध्द आगामी काळात थंडावणार की अधिक तापणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सिडकोने दिलेले परवानगी पत्र

एनआरआय कॉम्प्लेक्स पाठीमागील बाजूला पालिकेच्या बांधकाम परवानगीविना सुरु असलेले काम तात्काळ थांबवण्याची मागणी पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरीकांनी पालिका,सिडको व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.सीवूड्स एनआरआय कॉम्प्लेक्स येथील कामावरुन पर्यावरणप्रेमींनी वारंवार पालिका,सिडको, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठपुरावा करत आहे. पाणथळ जमिनीवर बहुमजली ९ निवासी संकुले व गोल्फ मैदान बनविण्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना दुसरीकडे न्यायालयाच्या सूचनांना केराची टोपली दाखवत या ठिकाणी बेकायदा बांधकाम सुरु असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी यांनी केला आहे.

सीवूड्स एनआरआय परिसरात सिडकोच्या परवानगीने मिस्त्री कंन्सट्रक्शन यांनी ७२४ झाडे तोडल्याप्रकरणी तसेच येथील गोल्फ कोर्स व गृहसंकुल निर्मिती प्रकरणाबाबत सुरवातीपासूनच पाठपुरावा करणारे या विभागातील पर्यावरणप्रेमी व नागरीक यांनी सातत्याने विरोधकेला आहे. सीवूडस सेक्टर ६० एनआरआय़ कॉम्प्लेक्स ऐ,बी,सी डी व ई ब्लॉकमधील ३३.५५ हेक्टर जागेवर गोल्फ कोर्स व बहुमजली निवासी उभारण्याची परवानगी सिडकोने दिली .परंतू सर्वोच्च न्यायालयानेही ऑक्टोबर २०१७मध्ये ही जागा पाणथळ यादीत असल्याने येथील काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते.नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील या जागेवर बांधकाम परवानगी सिडकोने दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून पालिकेच्या अधिकारावर हा गदा आणण्याचा प्रकार असून पालिकेनेही याबाबत संबंधित मे. मिस्त्री कन्स्ट्रक्शनला खुलासा करण्याचे पत्र दिले होते. परंतू पालिकेच्या पत्राबाबत संबंधित विकसकाने सिडकोने दिलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागानेही संबंधित कंपनीला तात्काळ खुलासा करण्याचे पत्र दिले होते त्याप्रमाणे पालिकेला खुलासा प्राप्त झाला असून या खुलाशामध्ये संबंधित विकसकाकडून सिडकोच्यावतीने देण्यात आलेल्या परवानगीचे पत्र जोडण्यात आलेले आहे. सरकारी आस्थापनांमध्येच सुरु असलेल्या परवानगीच्या अधिकारावरुन वादंग सुरु असून याचा फायदा विकासक घेत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी यांनी केला आहे.

हेही वाचा- व्यवहारातील पैसे दिले नाहीत म्हणून अपहरण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

एनआरआय कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजूस असलेल्या डी व ई पॉकेटमध्ये पालिकेची कोणतीही परवानगी न घेता काम सुरु आहे. पलिकेने विकासकाला बेकायदा बांधकाम करत असल्याबाबत ३० ऑगस्ट रोजी खुलासा मागितला होता.शहरात सरकारच्या दोन आस्थापनांना दिलेल्या अधिकारामुळे गोंधळ असून त्याचा फायदा विकासक घेत आहेत.सरकार जाणीवपूर्वक बिल्डरधार्जिणी निर्णय घेत असून ही बाब अत्यंत चुकीची आहे. उरण मधील पाणजे डोंगरी परिसरात कोल्ह्याचे दर्शनसुविधा पालिकेने पुरवायच्या व बांधकाम चार्जेस सिडको घेणार हा कुठला नियम ? याला तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशारा पर्यावरणप्रेमी, सुनील अग्रवाल यांनी दिला.

सीवीड्स एनआरआयमागील भूखंडाच्याबाबात पालिकेची परवानगी घेतली नाही व सिडकोने परवानगी दिली आहे. त्यामुळे शासनाने याबाबत योग्य तो धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. संबंधित विकासकाने सिडकोने दिलेली परवानगी पत्राला जोडली आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेतील नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण यांनी दिली.