नवी मुंबई: पुढील दोन महिन्यात आम्ही साडेतीन लाख घरी पोहचणार असून आगामी लोकसभा निवडणुकीत  ४५  पेक्षा अधिक जागा आम्ही निवडून आणू असा विश्वास भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. आज नवी मुंबईत जनसंवाद कार्यक्रमानिमित्त ते आले होते. यावेळी आमदार गणेश नाईक, भाजप नवी मुंबई अध्यक्ष संदीप नाईक तसेच पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. वाशीतील कार्यक्रमांना बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे या उपस्थित होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपचे सध्या जनसंवाद अभियान सुरू असून आज ऐरोली विधानसभेत सदर अभियान राबवले गेले. यात सुरवातीला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट, दुचाकी फेरी, एक सभा आणि “वारीयर्स ” मार्गदर्शनपर सभा असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. 

हेही वाचा… २६ ऑक्टोबरला उरण – खारकोपर लोकल धावणार? उरणकरांचे रेल्वेने मुंबई गाठण्याचे स्वप्न साकार होणार

नवी मुंबई मेट्रो बाबत छेडले असता आपल्यासर्वांना आंनद असला पाहिजे.. केंद्रात मोदींनी आणि राज्यात देवेंद्रनी जी कामे केलीत त्यामुळे ही उदघाटन होत आहेत..  ९  वर्षात जी विकासकामे केलीत त्याच शिदोरीवर आम्ही लोकांपर्यंत जातोय असे उत्तर दिले . तर मातोश्री वर किचन कॅबिनेट असल्याचा टोला त्यांनी लगावला तसेच उद्धव ठाकरेंकडे किंचित सेनेचे सरसेनापती.. त्यांच्या कार्यकारणीत विदर्भात, मराठवाड्यात ना उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं नाही. जे निष्ठावंत शिलेदार निघून गेलेत.. लोकंच उरली नाहीत तर पद कोणाला देतील ? असा खोचक प्रश्न त्यांनी केला. 

हेही वाचा… नवी मुंबईत सलग पाणीपुरवठा, दिवसातून एकदाच ६-७ तास पाणी मिळणार; महापालिकेकडून प्रायोगिक तत्वावर नियोजन

ठाण्यावर शिंदे गटाच्या शिवसेनेने दावा सांगितल्याने भाजपची पंचाईत झाली असल्याची होत असलेल्या चर्चे बाबत त्यांनी ठाण्यावर शिंदे गटाच्या शिवसेनेने दावा सांगितल्याने भाजपची पंचाईत झाली असल्याची होत असलेल्या चर्चे बाबत त्यांनी आमच्याकडे वर्चस्वाची लढाई नाही.. आमच्याकडे एकच आहे की मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरिता ठाणे लोकसभा महत्वाची आहे. त्यामुळे जागा कोणाला जाणार हे महत्वाचे  नाही तर विजय महत्वाचा आहे. असे त्यांनी सांगितले. याबाबत कमिटी निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will win more than 45 seats in the upcoming lok sabha elections bjp state president chandrasekhar bawankule expressed this belief dvr
Show comments