केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत राज्यातील १० शहरांमध्ये नवी मुंबईची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय पातळीवरील दुसऱ्या टप्प्यातील निवडीसाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असून स्मार्ट सिटी आराखडा तयार करताना त्यामध्ये नवी मुंबईकरांच्या सूचंनाचा समावेश असावा या दृष्टीने विष्णुदास भावे नाटय़गृहात नुकतीच एक बैठक झाली. यावेळी अनेक नागरिकांनी तोंडी सूचना मांडल्या. याशिवाय यासाठी ई-मेल आदी माध्यमांचा उपयोग करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या नागरिकांना  http://mygov.in / home /discuss या भारत सरकारच्या युआरएल संकेतस्थंळावर जाऊन discussion forum मध्ये  स्मार्ट सिटीविषयीच्या सूचना नोंदवता येतील, त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या http://www.nmmconline.com, http:// http://www.nmmconline.com/ या संकेतस्थळावरही युआरएलची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी  mygov.in, http:// mygov.in   या संकेतस्थळाला भेट देऊन नवी मुंबई शहर स्मार्ट सिटीबाबतच्या सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे व पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.

Story img Loader