|| विकास महाडिक

मुंढे-रामास्वामी तुलना करण्याची वेळ येण्याचे कारण कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा आहे. कर्मचारी अधिकारी तेच पण प्रशासक बदलला की या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वागणे बदलते हेच या प्रकरणावरून दिसून येते. मुंढे यांच्या काळात थरथर कापणारे अधिकारी आता पुन्हा कॉलर ताट करून फिरू लागले आहेत. त्यामुळे ‘मवाळ’ आयक्तांनाही कारवाईचे अस्त्र हाती घ्यावे लागले.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Top leaders including Prime Minister Home Minister and Priyanka Gandhi are touring Vidarbha
गृहमंत्री शहा यांचा दौऱ्यात नक्सली एलिमेंट नजरेत,शहा चहा घेत नाही म्हणून मग,,,
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
Donald trump, Elon Musk, Vivek Ramaswamy, Minimum Government, Maximum Governance
विश्लेषण : इलॉन मस्क, विवेक रामस्वामी ‘सरकार कार्यक्षमता’ मंत्री… ‘टीम ट्रम्प’ आतापासूनच का भरवतेय धडकी?
Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”
Kalwa-Mumbra Constituency,
कळवा-मुंब्य्रात गुरु-शिष्याची नव्हे तर धर्म-अधर्माची लढाई, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे मुंब्य्रातील सभेत विधान

नवी मुंबईकरांनी गेल्या दोन वर्षांत दोन वेगवेगळ्या प्रकारचे आयुक्त पाहिले आहेत. २७ वर्षांच्या पालिकेत अनेक आयुक्त झाले पण या दोन आयुक्तांची चर्चा अधिक काळ सुरू आहे. यातील एक जहाल तर दुसरे कमालीचे मवाळ. दीड वर्षांपूर्वी नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदाचा भार सांभाळणारे माजी आयुक्त तुकाराम मुंढे हे आक्रमक स्वभावाचे, त्यामुळे वादग्रस्त तर त्यांच्या पूर्णपणे विरोधी स्वभावाचे विद्यमान आयुक्त डॉ. रामास्वामी. मुंढे यांच्या काळात पालिकेतील अधिकारी कर्मचारी सुतासारखे सरळ झाले होते, तर रामास्वामी यांचा शांत सरळ स्वभाव बघता कर्मचाऱ्यांनी आपले जुने रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच अखेर नाइलाजास्तव आयुक्तांना १०२ लेट लतिफ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याची वेळ आली. मुंढे यांनी तर थेट १६ अधिकारी कर्मचाऱ्यांना घरी बसविले होते. शेकडो जणांना नोटीस दिल्या होत्या. दोन अधिकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले होते, तर चार जणांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती.

मुंढे रामास्वामी तुलना करण्याची वेळ येण्याचे कारण कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा आहे. कर्मचारी अधिकारी तेच पण प्रशासक बदलला की या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वागणे बदलते हेच या प्रकरणावरून दिसून येते. मुंढे यांच्या काळात थरथर कापणारे अधिकारी आता पुन्हा कॉलर ताट करून फिरू लागले आहेत. मुंढे यांच्या वॉक विथ कमिशनर या जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांना आयुक्तांकडे तक्रार करू नये म्हणून त्यांच्या समस्या अगोदरच सोडविल्या जात होत्या तेच रामास्वामी यांच्या कारकीर्दीत अधिकाऱ्यांना शंभर वेळा समस्या आणि कामे सांगण्याची वेळ आली आहे. आपल्या संस्थेचा प्रमुख कशा स्वभावाचा आहे यावरून कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय संस्थेतील कर्मचारी आपली वागणूक ठरवत असल्याचे दिसून येते. नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी मागील २१ आयुक्तामध्ये आलेले मुंढे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांचा रक्तदाब वाढविला होता. कामावर आल्यानंतर सुखरूप घरी जाऊ की नाही अशी स्थिती येथील अधिकारी कर्मचाऱ्यांची झाली होती. सकाळी आयुक्त येणार म्हटल्यावर प्रवेशद्वारापासून सभागृहापर्यंत कर्मचारी कसे हात जोडून उभे राहात होते. त्याच्याबरोबर उलटा कारभार पुन्हा पालिकेत सुरू  झाला आहे. त्यामुळेच आवो जावो घर हमारा म्हणणाऱ्या १०२ कर्मचाऱ्यांना शांत रामास्वामींना देखील नोटीस देण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. रागापेक्षा प्रेमाने जग जिंकता येईल यावर विश्वास ठेवणाऱ्या आयुक्तांना अखेर कारवाईचे हत्यार उपसावे लागले. काही दिवसांपूर्वी एका बैठकीसाठी आयुक्त आणि पालिकेचे काही अधिकारी बंगळूरुला गेले होते. त्या वेळी पालिकेच्या पैशाची उधळपट्टी न करता मित्राच्या घरात राहणाऱ्या  आयुक्तांनी सोबतच्या अधिकाऱ्यांची पण तेवढय़ाच आस्थेने काळजी घेतली होती. सहकारी अधिकाऱ्यांचा अपमान न करता त्यांच्या कलेने कामकाज करणाऱ्या आयुक्तांना अखेर कर्मचाऱ्यांनी कडक बनण्यास भाग पाडले आहे. आयुक्तांनी आता प्रत्येक प्रभागात संपर्क मोहीम सुरू केली आहे. मवाळ आयुक्तांवर आता लोकप्रतिनिधीदेखील तोंडसुख घेऊ लागले आहेत. आयुक्तांचे दोन-तीन लोकाभिमुख प्रस्ताव फेटाळण्याचे पाप केले आहे.

मुंढे यांच्या काळात अशा प्रकारचे प्रस्ताव फेटाळल्यास ते नगरविकास विभागाकडून मंजूर करून आणले जात होते. मुंढे यांच्याप्रमाणे न वागता लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आयुक्त काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गेली आठ ते दहा वर्षे सारखी चिक्की खाऊन कंटाळा आला आहे. त्यांना पोषक अल्पोपाहार देण्यात यावा ही आयुक्तांची सूचना सत्ताधारी पक्षाने फेटाळली आहे. आयुक्तांचा पोषक अल्पोपाहार आणि सत्ताधाऱ्यांची चिक्की हा सामना येत्या काळात रंगणार आहे. खारघरला इस्कॉन ही सेवाभावी संस्था हे गरमागरम व सकस आहार प्रत्येक शाळेत पोहोचविण्यास तयार आहेत. त्याच्या वाहतुकीसाठी दोन पैसे जास्त लागणार आहेत. चिक्की काय एकदा आणून शाळेत टाकली की झाले काम. विद्यार्थ्यांना गरम जेवण दररोज मिळणार आहे. त्याला सत्ताधाऱ्यांनी विरोध करणे म्हणजे अनाकलनीय आहे. हीच स्थिती शहरातील पार्किंगबाबत आहे. शहरात अस्ताव्यस्त होणाऱ्या पार्किंगवर आळा बसावा यासाठी काही दर ठरविणे आवश्यक आहे. त्यालाही नगरसेवकांनी विरोध केला आहे. आयुक्त थोडे संथगतीचे असल्याचा आरोप आहे. प्रत्येक काम स्वत: पाहिल्याशिवाय मंजुरी देत नाहीत. त्यामुळे काही कामे थांबली आहेत. तो धागा पकडून महापौरांनी प्रशासन धावले पाहिजे असा उपरोधिक सल्ला दिला. मुंढे यांच्या काळात धावणारे प्रशासनही नगरसेवकांना नकोसे झाले होते. तुम भी खावो हम भी खायेंगे असे आयुक्त सत्ताधाऱ्यांना लागतात. त्या वेळी ते चांगले आयुक्त ठरतात. मुंढे रामास्वामीसारखे आयुक्त कोणत्याच अधिकारी, नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांना परवडत नाहीत हेच खरे.