नवी मुंबई महापालिकेने सुरूवातीपासूनच लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजन केल्यामुळे १८ वर्षावरील वयाच्या लसीकरणाचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे १०० टक्के उद्दिष्ट गाठणारी नवी मुंबई महानगरपालिकाही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.१६ मार्चपासून शहरातील १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणास प्रारंभ झाला त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. शहरातील नेरुळ,ऐरोली,वाशी,तुर्भे,तसेच कामगार विमा रुग्णालय येथील जम्बो सेंटर बरोबरच शहरातील २०८ शाळांमध्ये १२ ते १४ वयोगटातील लसीकऱणाचे पालिकेने नियोजन केले असून पालिकेला लहानमुलांच्या लसीकरणासाठी ९२८०० कोर्बेवॅक्स लसमात्रा मिळाल्या असून पालिकेने जवळजवळ ४७१४४ लसमात्रांचे लसीकरण केले आहे. दुसऱ्या लसमात्रेला मुलांचा प्रतिसाद वाढला असून पालिकेने दोन्ही लसमात्रांचे लवकरात लवकर लसीकरण करण्याचे लक्ष ठेवले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा