मुंबई विमानतळावरील वाहतूक आणि प्रवासी ताण कमी करण्याकरता नवी मुंबई विमानतळाची निर्मिती करण्यात येत आहे. हे नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईचा आर्थिक विकास वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले हे विमानतळ अनेक अडचणींचा सामना करत आहे. त्यामुळे हे विमानतळ केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न सातत्याने विचारण्यात येतोय. या प्रश्नाचं उत्तर अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी दिलं आहे. या विमानतळाची जबाबदारी अदाणी समूहाकडे आहे. अदाणी समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाबाबत घोषणा करण्यात आली आहे. तसंच, विमानतळाचा प्रकल्प हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्याकरता नवी मुंबई विमानतळ प्रस्तावित करण्यात आले होते. १९९९ साली या विमानतळसाठी परवानगी देण्यात आली. वर्षाला २ कोटी प्रवाशांसाठी येथे टर्मिनल १ बांधण्यासाठी काम जोरात सुरू आहे. त्यानंतर प्रवासी क्षमता लक्षात घेऊन बांधकाम करण्यात येणार आहे. सुरुवातीला हा प्रकल्प GVK समूहाकडे होता. परंतु, जुलै २०२१ मध्ये हा प्रकल्प अदाणी समूहाकडे आला. अदाणी समूह हा भारतातील सर्वांत मोठा खासगी विमानतळ ऑपरेटर असलेला समूह आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासह ७ विमानतळांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी अदाणी समूहाकडे आहे.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Amit Shah canceled four Nagpur meetings and left for Delhi sparking political speculation
विदर्भातील सर्व सभा तडकाफडकी रद्द करून अमित शहा दिल्लीला
akshay kumar share update on phir hera pheri 3
‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “पुढील वर्षी…”
manoj jarange patil health update
“मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, हे शरीर कधी जाईल…”, मनोज जरांगे पाटलांचं भावनिक विधान!
IPL 2025 Mega Auction Date, Time and Live Streaming in Marathi
IPL 2025 Mega Auction Schedule: आयपीएल २०२५ चा महालिलाव किती वाजता सुरू होणार? लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल? जाणून घ्या
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आगामी काळात मुंबई महत्त्वपूर्ण राष्ट्रीय केंद्र बनणार असल्याचं अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे सीईओ अरुण बन्सल यानी मार्च महिन्यात म्हटलं होतं. त्यामुळे विकासाला चालना मिळण्याकरता नवी मुंबई विमानतळ वेळत पूर्ण होणे गरजेचे आहे. हे नवे विमानतळ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार असल्याचं गौतम अदाणी यांनी स्पष्ट केले आहे.