मुंबई विमानतळावरील वाहतूक आणि प्रवासी ताण कमी करण्याकरता नवी मुंबई विमानतळाची निर्मिती करण्यात येत आहे. हे नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईचा आर्थिक विकास वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले हे विमानतळ अनेक अडचणींचा सामना करत आहे. त्यामुळे हे विमानतळ केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न सातत्याने विचारण्यात येतोय. या प्रश्नाचं उत्तर अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी दिलं आहे. या विमानतळाची जबाबदारी अदाणी समूहाकडे आहे. अदाणी समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाबाबत घोषणा करण्यात आली आहे. तसंच, विमानतळाचा प्रकल्प हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in