नवी मुंबई -ऐरोली टपाल कार्यालयासाठी सिडकोकडून खरेदी केलेल्या भूखंडावर गेल्या १९ वर्षांत वस्तू उभारण्यात आली नव्हती. परंतु ऐरोली सेक्टर १८ येथील भुखंड मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आधुनिक सुविधांसह तीन मजली टपाल कार्यालय उभारण्यात आले आहे. या टपाल कार्यालयाचे कामकाज मागील काही महिन्यांपासून सुरु करण्यात आले आहे. परंतु या ठिकाणी तांत्रिक पद्धतीने स्वयंचलित पोस्टल पार्सल सुविधा अद्याप प्रतीक्षेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरीकडे महाराष्ट्र विभागीय पोस्टजनरल अभिताभ सिंह आणि मुख्य पोस्टजनरल मुंबई विभाग किशन कुमार शर्मा यांना खासदार राजन विचारे यांनी लेखी निवेदन पाठवून ह्या नव्या पोस्टल इमारतीचे लोकार्पण करावे व स्वयंचलित पोस्टल सुविधा सुरु करावी अशी मागणी केली आहे.कोपरखैरणे त्याचप्रमाणे ऐरोली सेक्टर-१७ येथील सिडको निर्मित वाणिज्य संकुलातील दोन गाळयामध्ये जीव मुठीत धरुन कर्मचारी ऐरोली टपाल कार्यालयाचे मागील २७ वर्षापासून कामकाज सुरु होते.विभागीय टपाल कार्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी ऐरोली सेक्टर १८ येथील भूखंड क्रमांक १ मिळाला होता.मात्र दिल्लीत टपाल विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत वर्षांनुवर्ष फाईल अडकली होती. ऐरोलीतील राखीव भूखंड अतिक्रमण मुक्त करण्यात आल्यानंतर त्या जागेची मंजुरी मिळवणे, कार्यालय उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देणे, विकास आराखडे तयार करून मंजुरी करून घेणे, बांधकाम शुल्क आघाडीत सवलत मिळून देणे अशा महत्वपूर्ण तांत्रिक बाबीं पूर्ण करण्यात आल्यानंतर ३९९९ चौमी. भुखंडावर ६ जून २०१९ मध्ये कार्यालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती.

ऐरोलीतील मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या टपाल कार्यालयाची तळ मजल्यासह दुमजली प्रशस्त इमारत साकारली आहे.महाराष्ट्रातील सर्वात मोठे पार्सल हब या ठिकाणी असून दुमजली वास्तूत इतर सुुविधांनी परिपुर्ण कार्यालय तयार करण्यात आली आहेत. ऐरोलीतील या टपाल कार्यालयातील कामकाजही काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आले आहे. परंतु पार्सल प्रक्रियेचे काम संपूर्ण तांत्रिक पद्धतीने होत नाही.याबाबत महाराष्ट्र विभागीय पोस्टजनरल अभिताभ सिंह यांच्याकडेही याबाबत कार्यवाही सुरू आहे. पार्सल प्रक्रियेत गुंतलेली मशिनरी उपकरणे आणि तंत्रज्ञान जटिल स्वरूपाचे असल्याने आणि संपूर्ण भारत स्तरावरील अशा प्रकारच्या पहिल्या प्रकल्पांपैकी एक प्रकल्प असल्याने, त्याला अंतिम स्वरूप देण्यास वेळ लागत असल्याचे चित्र असून टपाल विभाग याला जलद आणि अंतिम स्वरूप देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती ऐरोलीतील टपाल कार्यालय प्रमुख नितीन येवला यांनी दिली. याबाबत वरिष्ठ पातळीवर निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऐरोली येथे संपूर्ण स्वयंचलित पार्सल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित होणार असल्याचे चित्र आहे.

कोपरखैरणे व ऐरोलीत जुन्या पडीक गाळयामध्ये टपाल कार्यालयात कर्मचारी काम करत होते. पोस्ट कार्यालयांच्या जमिन हस्तांतरण व निधीपासून पाठपुरावा केल्यानंतर ऐरोली सेक्टर-१८ मध्ये भव्यत्तम पोस्टल कार्यालय साकारले आहे.सध्या पोस्टाच्या नवनवीन योजना येत आहेत.पोस्टांचे अनेक खातेधारक आहेत.त्यांना सुुविधांचा लाभ घेण्यासाठी नवे टपाल कार्यालय महत्वाचे ठरणार असून पोस्टाच्या कार्यालयाचे लोकार्पण करून नागरिकांना सुविधांचा करून द्यावा.- राजन, विचारे,खासदार

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will post automated parcel hub center in airoli start navi mumbai amy
Show comments