नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने वाशी सेक्टर १६ ए येथील नाल्यावर ३० गाळ्यांचे बांधकाम केले आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून हे गाळे कुणालाही वितरित न केल्याने हे गाळे धूळखात पडून होते. दोन वर्षांपूर्वी गाळ्यांचे रंगकाम करून नवीन शटर लावण्यात आले होते. मात्र आता पुन्हा गाळ्यांची दुरवस्था झाली असून गाळ्यांचे शटर पूर्णपणे गंजले आहेत. अनधिकृत असलेल्याने वापराविना गाळे धूळखात पडून आहेत. महापालिका या गाळ्यांचा तिढा कधी सोडविणार, की वारंवार गाळ्यांच्या दुरुस्तीवर उधळपट्टी करणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने वाशी सेक्टर १६ ए येथील नाल्यावर पे अँड पार्कबरोबरच विविध व्यवसायिक कारणांसाठी ३० गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. दिव्यांगांना हे गाळे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र माजी आयुक्त रामस्वामी एन यांनी हे गाळे अनधिकृत असून याला परवानगी देता येणार नाही, त्यामुळे हा प्रस्तावही रद्द करण्यात आला. तेव्हापासून अनधिकृत गाळे असल्याने हे तसेच पडून आहेत.

हेही वाचा – उरणच्या ओएनजीसी प्रकल्पातून क्रूड (स्लज) तेलाची गळती, उग्रवासाने नागरिक त्रस्त, शेती आणि समुद्र किनाऱ्यावरील जीवनाला धोका

हेही वाचा – गॅस सिलिंडरचा स्फोट आणि आगही; दुसऱ्या माळ्यावर ७ ते ८ जण अडकले

दोन वर्षांपूर्वी स्वच्छता सर्वेक्षणाच्या तोंडावर या गाळ्यांचे पुन्हा रंगकाम करून शटर बदलण्यात आले होते. नागरिकांनी अनधिकृत बांधकाम केले तर ते कारवाई करून निष्कासित केले जाते. मात्र महापालिका अनधिकृत बांधकामवर पुन्हा वारेपमाप खर्च करीत आहे. या गाळ्यांबाबत मालमत्ता आणि नगररचना विभागाकडून एकमेकांकडे बोट दाखवत हातवर केले जात आहेत. या ठिकाणी नागरिकांच्या सेवेसाठी पाणी, टेलिफोन, वीज, मालमत्ता कर, वाहतूक पोलीस बिट, महाई सेवा केंद्र याकरिता उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.