नवी मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून नवी मुंबई राजकारणातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या नेत्यांत “डॉन” या शब्दप्रयोगावरून राळ उठली आहे. यात आगामी मनपा निवडणुकीचे युती बाबतही सल्ले दिले जात आहेत. हा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेणार असल्याचे बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी इशारा दिलाय.
हेही वाचा >>> उरणच्या मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण
हेही वाचा >>> घाऊक बाजारात डाळींबाचा उच्चांक, प्रतिकिलो अडीचशे रुपयांवर
नवी मुंबईतील ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईकांनी काही दिवसांपूर्वी ऐरोली झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प वरून शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्यावर टीका करत त्यांचा डॉन असा अप्रत्यक्ष उल्लेख केला होता. यावरून राजकीय वातावरण तापले व चांगल्या गोष्टीसाठी वाईट वृत्तीच्या विरोधात प्रसंगी डॉन बनेल अशा आशयाचे वक्तव्य विजय चौगुले यांनी केले तर यावर शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत एखादा व्यक्ती काही बोलला म्हणून त्यावरून वातावरण बिघडत नाही.असा टोला अप्रत्यक्षपणे नाईक यांना लगावला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी युतीमध्ये स्थानिक निवडणुका लढवल्या जाणार असल्याचे सांगितले असून ज्यांना हे मान्य नसेल ज्यांना युतीचा धर्म पाळायचा नसेल त्यांना पक्ष सोडावा लागेल अशो रोखठोक भूमिका व्यक्त केलेय. समजूतदारपणा दाखवावा लागतो राजकारणात इंमॅच्युअर वागून चालत नाही आणि युतीचा निर्णय वरचे लोक करत असतात, यांच्या हातात काही नाही असा टोला लागवत यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया विजय नाहटा यांनी व्यक्त केले आहे.