घाऊक बाजारात ४ ते ९ रुपये तर किरकोळीत १० ते १२ रुपये प्रति किलो

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पूनम धनावडे, नवी मुंबई</strong>

वाशीतील एपीएमसी बाजारात महिनाभरापासून जुन्या कांद्याची आवक वाढली आहे. यातील काही कांदे कोंब आलेले किंवा सडके निघत असल्यामुळे कांद्याचे दर घसरले आहेत. याचा फटका नव्या कांद्यालाही बसला असून त्याचेही दर कोसळले आहेत. घाऊक बाजारात जुना कांदा एक ते चार रुपये तर नवीन कांदा ४ ते ९ रुपये किलोने विकला जात आहे. किरकोळ बाजारात हे दर २५ ते ३० रुपये प्रति किलोवरून १० ते १२ रुपये किलोवर आले आहेत.

नवीन कांद्यात आद्र्रता अधिक असल्यामुळे तो जास्त काळ टिकत नाही. उन्हाळी म्हणजेच रब्बी हंगामातील कांदा सहा महिने साठवता येतो मात्र खरीप हंगामातील कांदा महिन्यापेक्षा जास्त साठविता येत नाही. त्यानंतर तो कुजू लागतो. त्यामुळे ग्राहक जुना कांदा खरेदी करण्यास प्राधान्य देतात. डिसेंबरमध्ये जुन्या साठवणीच्या कांद्याची आवक जास्त झाली आहे, मात्र त्यातील निम्मे कांदे सडके निघत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या साठवलेल्या कांद्यला थंडीमुळे कोंब येणे, ते काळे पडणे, कुजणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे त्याला उचल नाही. नवीन कांदा फार काळ टिकत नसल्यामुळे त्याला मागणी फार कमी आहे. शेत मालावरील निर्बंध उठवल्याने बाजारात थेट विक्री होऊ लागली आहे. परिणामी एपीएमसी बाजारातील मालाला उठाव कमी आहे. त्यामुळेही बाजार भाव कोसळले आहेत.

यंदा नवीन कांदा वरचढ

नाशिक, पुणे, नगर या भागांतून जुना कांदा मोठय़ा प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात होते. सध्या रोज कांद्याच्या १००हून अधिक गाडय़ा दाखल होत आहेत. त्यामध्ये ६० ते ७० गाडय़ा जुना कांदा तर २५ ते ३० गाडय़ा नवीन कांदा आहे. २०१७ मध्ये या हंगामात नवीन कांद्याच्या एकूण ५०-५५ तर जुन्या कांद्याच्या ४० गाडय़ा दाखल होत होत्या. सध्या बाजारात दाखल होणाऱ्या कांद्याच्या गाडय़ांपैकी रोज ४० गाडय़ा जुना कांदा शिल्लक राहत आहे. त्यामुळे जुना कांदा एक ते चार तर नवीन कांदा चार ते नऊ रुपयांवर आला आहे. नवीन मोठे कांदे ९ ते १० रुपये किलोने विकले जात आहेत.

लसूणही स्वस्त

वाशी बाजारात लसणाची आवक वाढल्याने, उठाव कमी होत असल्याने भाव कोसळले आहेत. सध्या घाऊक बाजारात ६ ते १५ रुपये, तर किरकोळीत ४० ते  ६० रुपये प्रति किलो दराने लसूण उपलब्ध आहे. सध्या मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश येथून ५० किलोच्या तीन-साडेतीन हजार गोणी येत आहेत. शेतमालावरील निर्बंध हटविल्याने घाऊक बाजार सोडून इतरत्रही विक्री होत आहे. नालासोपारा, मीरा भाईंदर, बोरिवली येथील घाऊक बाजारांत थेट विक्री सुरू झाल्याने त्या भागातील ग्राहकांनी एपीएमसीकडे पाठ फिरली आहे.

यंदा जुना कांदा अधिक दाखल होत असून निम्मा कांदा खराब निघत असल्याने मागणी कमी आहे, परिणामी नवीन कांद्याचेही भाव उतरले आहेत.

– रामदास कड, घाऊक व्यापारी, एपीएमसी

दरांतील घसरण

कांद्याचा प्रकार    वर्ष           घाऊक        किरकोळ

नवीन कांदा         २०१७         १२ ते १८         ३५

२०१८         ४ ते  ९             १० ते १५

जुना कांदा           २०१७         २० ते ३०         ५०

२०१८         १ ते ४             १० ते १२