पनवेल : १९ वर्षीय प्रेयसीची हत्या करून नंतर आत्महत्या करणाऱ्या वैभव बुरुंगले याच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीचा मृतदेह शोधण्यासाठी इतके दिवस का लागले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना केली नसती तर तिचा मृतदेह सापडला असता का, असाही प्रश्न आहे.
वैभव बुरुंगले याने प्रेयसी वैष्णवी हिची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली होती. या प्रकरणातील कंगोरे महिन्याभरानंतर समोर येत आहेत. १२ डिसेंबर रोजी वैभव याचा मृतदेह नेरुळ जुईनगर दरम्यान रेल्वे रुळाजवळ सापडला होता. मात्र, महिन्याभरानंतरही बेपत्ता वैष्णवीचा शोध लागला नव्हता. तीन दिवसांपूर्वी वैष्णवी हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर कळंबोली पोलिसांनी वैभव याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.
हेही वाचा – स्वच्छ रेल्वे स्थानकांत पनवेल अव्वल
हेही वाचा – उरण : हत्येची अफवा पसरविणाऱ्यास अटक
वैष्णवी हिच्या वडिलांनी कळंबोली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ते कळंबोलीतील एका शाळेच्या बसवर चालक म्हणून काम करतात. एक १३ वर्षांचा मुलगा आणि मुलगी वैष्णवी आणि पत्नी असे त्यांचे कुटुंब आहे. ते सेक्टर ३ येथील एलआयजी येथे भाड्याच्या घरात राहतात. वैष्णवी हिने वैभव याला भेटणे बंद केल्यामुळे तिची हत्या करण्यात आली.