एका मुलीसोबत जुळलेल्या प्रेमसंबंधांत अडसर ठरत असल्यामुळे पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला येथील पोलिसांनी अटक केली आहे. राकेश नौकुडकर असे या नराधमाचे नाव आहे. एनआरआय सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीपीएस स्कूल परिसरात एका महिलेचा मृतदेह गस्त घालत असणाऱ्या पोलिसांना बुधवारी आढळून आला. त्या मृतदेहाच्या बाजूला असणाऱ्या पर्समध्ये राकेश नौकुडकर या नावाचे आधारकार्ड मिळून आले. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आरोपी राकेश नौकुडकर याला बोलावण्यात आले. शवविच्छेदन चाचणीत डोक्यास जखम व गळा आवळल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. राकेश याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली असता खून केल्याची कबुली राकेशने दिली. अन्य एका मुलीशी प्रेमसंबंध जुळल्याने पत्नीकडे घटस्फोटाची मागणी करूनही तिने त्यास नकार दिला. त्याचा राग येऊन पत्नीची हत्या केल्याचे राकेशने पोलिसांना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा