खारघर डोंगरावर वारंवार आगीच्या घटना; पर्यावरणप्रेमींकडून संताप
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
खारघर वसाहतीला लागून असलेल्या डोंगररांगा गेल्या काही दिवसांत लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. हजारो हेक्टर निसर्गसंपदा जळून खाक झाल्याने येथील पक्ष्यांचा अधिवासही धोक्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दर वर्षी हिवाळा व उन्हाळ्यात या आगी लागतात, मात्र या हिरवळीच्या संरक्षणासाठी सिडको व वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचही आरोप होत आहे.
खारघर वसाहतीच्या पश्चिमेला डोंगररांगा आहेत. हजारो हेक्टर क्षेत्र असणारे या डोंगरातील निम्याहून अधिक परिसर वन विभागाच्या मालकीचा आहे. तर सिडको मंडळाचीही मालकी या डोंगरांगावर आहे. या डोंगरांवर विकास करण्यास येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे येथील निसर्ग टिकवून ठेवणे हाच एकमेव पर्याय दोनही सरकारी प्राधिकरणांसमोर आहे. मात्र या डोंगरातून उत्पन्न नसल्याने याकडे सरकारी प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. दर वर्षी या डोंगररांगांवर हिरवळ वाढावी व टिकावी यासाठी शेकडो हात पुढे आले आहेत.
डोंगरात हिरवळ उभी करणे हीच मोहीम घेऊन सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी डोंगरात वृक्ष लागवड करणे आणि हिवाळा व उन्हाळ्यात ही वृक्षांच्या संगोपनासाठी झटत आहेत. स्व खर्चाने ही मंडळी येथे श्रमदान करून राबत असताना सरकारी प्रशासनाने मात्र त्यांना कधीही मदत न केल्याचे लोक सांगत आहेत. उलट डोंगरावर वृक्षांच्या संगोपणासाठी जलस्रोत करण्याच्या कामाला सरकारी प्रशासनाने गती दिलेली नाही. स्वत:च्या दुचाकी घेऊन व कधी खांद्यावर मोठे हंडे घेऊन पर्यावरणप्रेमी खारघरचे डोंगर हिरवळ होण्यासाठी मेहनत करीत आहेत.
लग्नाचा वाढदिवस, जन्मदिवस अशा निमित्ताने येथे वृक्षलागवड केली जाते. मात्र २७ नोव्हेंबर, १६ डिसेंबर आणि १८ डिसेंबर या तीन आगीच्या घटनांनी ही डोंगररांग खाक झाली आहे. भारती विद्यापीठाच्या मागील बाजूकडील आणि ओवे कॅम्प येथील डोंगररांगावरील निसर्गसंपदा नष्ट झाली आहे.
कठोर कारवाईची मागणी
रहिवासी मिळून ओवे गावालगतची डोंगररांगांवर हिरवळ उगविण्याचा प्रयत्न मागील तीन वर्षांपासून करीत आहोत. यंदाही २० हजार विविध वृक्षांची बिजांची बॉल टाकले आहेत. डोंगररांगांवर आग लागण्याची घटना १६ तारखेला दुपारी घडल्यानंतर मीच अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाने तातडीने ही आग विझविली. आगीच्या नेमक्या घटना कोण करते त्यांना आतापर्यंत पकडणे शक्य झालेले नाही. मात्र हे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी धर्मेद्र कर यांनी केली.
आगीच्या घटना टाळण्यासाठी डोंगराच्या खालील बाजूस वाढलेले गवत कापले. यंदा आगीच्या घटना वरच्या बाजूकडून सुरू झाल्या. खालील बाजूस लागलेली आग विझविण्यासाठी पाणी नियंत्रणाच्या वेगळ्या जोडण्या तेथे केल्या आहेत. अजूनही गवत कापण्यासाठी पाच कटर यंत्रे काम करत आहेत. पाच रक्षक नेमण्यात आले आहेत. वन विभाग नेहमीच उपद्रवी व्यक्तींना येथे येण्यास मज्जाव करतो. पर्यटनाच्या नावाखाली काही जण सिगारेट आणि त्याच आगकाडीमुळे आगीच्या घटना घडल्याचे अनेकदा दिसते. प्रशासनाला नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे. – ज्ञानेश्वर सोनावणे, वन संरक्षक, वन विभाग