लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षणात केवळ देशात आपले आपले स्थान टिकविणे यासाठी नवी मुंबई महापालिका प्रयत्न करत नसून देशात स्वच्छ शहरात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी पालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. गेल्यावर्षी नवी मुंबई शहराला देशात स्वच्छ अभियानात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले होते. यावर्षी आता नवी मुंबई महापालिकेला स्वच्छ शहर अभियानात कितवा क्रमांक मिळणार याची उत्सुकता लागली असून स्वच्छ शहर अभियानाचा निकाल ११ जानेवारीला जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे याची उत्सुकता नवी मुंबईकरांना आहे.

Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
Mumbai zopu yojana loksatta news
घर मिळालेल्या झोपडीवासीयांच्या नावे पुन्हा पात्रता! घोटाळा उघड होऊन वर्षभरानंतरही कारवाई नाही

गतवर्षीच्या देशपातळीवर राबवण्यात आलेल्या स्वच्छ शहर अभियानात इंदोरने प्रथम क्रमांक पटकावला होता.तर दुसऱ्या स्थानावर सुरत तर तिसऱ्या स्थानावर नवी मुंबई शहर होते. यावर्षीही नवी मुंबई महापालिकेने निश्चय केला नंबर पहिला हे ब्रीदवाक्य घेऊन शहरात स्वच्छ शहर अभियानाअंतर्गत कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत. देश पातळीवर प्रथम क्रमांक मिळण्याची पालिकेला उत्सुकता असून यावर्षी स्वच्छतेत कितवा क्रमांक मिळणार याची उत्सुकता आहे.

आणखी वाचा-पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचे शुक्रवारी पुन्हा उद्घाटन

नवी मुंबई शहरात नंबर वनची क्षमता असल्याने शहराकडून खूप मोठ्या अपेक्षा नागरीक ठेऊन आहेत. त्यामुळे नवी मुंबई नागरीकही मागील अनेक वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणात उत्साहाने सहभागी होतात. नवी मुंबईच्या स्वच्छता मानांकनात नागरिकांच्या सहभागाचा महत्त्वाचा वाटा असून लोकसहभागावर भर देणारे विविध उपक्रम पालिकेने राबवले आहेत. पालिकेने रंगरंगोटी, स्वच्छता, शहर सौंदर्यीकरण याबरोबरच स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत.त्यामुळे नवी मुंबई शहराचा स्वच्छतेत राज्यात सातत्याने प्रथम क्रमांक येत असताना आता देशात कितवा क्रमांक मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गतवर्षीच्या स्वच्छ शहर अभियानात इंदोरने प्रथम क्रमांक पटकावला होता.तर दुसऱ्या स्थानावर सुरत तर तिसऱ्या स्थानावर नवी मुंबई शहर होते. यावर्षीही नवी मुंबई महापालिकेने निश्चय केला नंबर पहिला हे ब्रीदवाक्य घेऊन शहरात स्वच्छ शहर अभियानाअंतर्गत कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत.

आणखी वाचा-नवी मुंबई : गुगल मॅपवर रिव्ह्यूसाठी पैशाचे आमिष, साडेतीन लाखांची फसवणूक 

पालिकेने देशात प्रथम क्रमांक मिळवण्याचे लक्ष्य ठेऊन स्वच्छतेचे उपक्रम राबवलेत. तमाम नवी मुंबईकरांना पालिकेला प्रथम क्रमांक मिळावा याची आशा आहे. २०१४ पासून स्वच्छ सर्वेक्षणात महापालिका सहभागी होत आहे. यंदा प्रथम क्रमांक मिळेल अशी आशा आहे. -डॉ. बाबासाहेब राजळे, स्वच्छ सर्वेक्षण अभियान प्रमुख, नवी मुंबई महापालिका

Story img Loader