उरण : तालुक्यात सध्या थंडीतील दवावर पिकवण्यात आलेल्या सेंद्रिय वालाच्या शेंगांचा हंगाम सुरू झाला आहे. तब्बल चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर हे पीक आले आहे. येथील चिरनेरसह कळंबुसरे, कोप्रोली, नागाव ,केगाव ,साई, दिघाटी, केळवणे, खारपाडा या परिसरात वालाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भात शेती नंतर त्याच शेत जमिनीवर वाल बियाणे टाकण्यात येते मात्र त्यासाठी पाणी न घालता या काळात येणाऱ्या थंडीतील दवाच्या पाण्यावर हे वाल पीक घेतले जाते. त्यामुळे ते चविष्ट आणि उत्तम दर्जाचे असते.या वालाच्या शेंगा बाजारात येऊ लागल्याने, ग्राहक वालाच्या शेंगा घेण्यास आतुर झाले आहेत. वालाच्या शेंगा व चवळीच्या शेंगांसाठी थंडीचा हंगाम खूप उपयुक्त आहे. थंडीत पडणाऱ्या दवावर हे पीक तयार होते. जेवढी जास्त थंडी तेवढे हे पीक मोठ्या प्रमाणावर भरघोस असे येते. दरम्यान ही पिके तयार होण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे खूप थंडी व दव पडल्याने वाल व चवळीच्या शेंगांच्या पिकांमध्ये भरघोस वाढ झालेली आहे.

मात्र या पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मेहनत घेऊन, शेताची राखण करावी लागते. वाल व चवळीच्या शेंगांमुळे शेतकऱ्यांना ८० ते ९० हजार रुपयांचा नफा मिळत आहे. भात पिकानंतर वाल, चवळी, हरभरा, मूग तसेच अन्य कडधान्यांचे पीक घेतले जाते. वालाच्या शेंगांना प्रचंड प्रमाणावर मागणी असून, येथे चवळीच्या शेंगांचा एका किलोचा दर १२० रुपये तर वालाच्या शेंगांचा एका किलोचा दर दीडशे रुपये असा आहे.

भौगोलिक मानांकन देण्याची मागणी

चार महिन्यांत येणाऱ्या या दवावर पिकलेल्या वालाचा उत्तम दर्जा असून त्याला भौगोलिक मानांकन देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. भात शेती नंतर त्याच शेत जमिनीवर वाल बियाणे टाकण्यात येते मात्र त्यासाठी पाणी न घालता या काळात येणाऱ्या थंडीतील दवाच्या पाण्यावर हे वाल पीक घेतले जाते. त्यामुळे ते चविष्ट आणि उत्तम दर्जाचे असते.