नवी मुंबई: काही दिवसापूर्वी कळंबोली येथून पुण्याला जाणाऱ्या व्यक्तीने मोबाईल गाडीत विसरला होता. वाहतूक पोलिसांच्या मदतीने गाडी मालकाचा शोध घेत सदर मोबाईल परत  मिळवण्यात यश आले होते. असाच प्रकार वाशी येथेही घडला असून विसरलेली बॅग अवघ्या वीस मिनिटात शोधण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरुवारी अपरात्री अजित सिंग हे वाशी स्टेशन पासून वाशी सेक्टर २८ पर्यंत रिक्षाने गेले. आपले ठिकाण आल्यावर त्यांनी रिक्षा चालकाला पैसे देऊन ते घरी निघाले होते. काही अंतर गेल्यावर खरेदी केलेल्या वस्तूंची बॅग रिक्षातच विसरल्याने त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते पुन्हा रिक्षाला शोधण्यास वाशी ब्ल्यू डायमंड चौकात आले.

हेही वाचा… बेमुदत लाक्षणिक उपोषण: ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनासह अन्य समस्या सोडवा मुख्य मागणी – इंटक

रिक्षा कुठे दिसते का हे पाहत असताना उपस्थित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना काय झाले म्हणून विचारणा केल्यावर त्यांनी घडलेली घटना सांगितली. सुदैवाने अजित सिंग यांच्या लक्षात रिक्षा क्रमांक होता. त्यांनी रिक्षा क्रमांक (एम एच ४३ बी आर ५२९५) सांगताच वाहतूक पोलिसांनी त्यांच्या कडील ऍपच्या मदतीने रिक्षा मालकाचा शोध घेत मोबाईल क्रमांक मिळवला. गणेश पुरणे  असे रिक्षा चालकाचे नाव होते. त्याला फोन करून विचारणा केली असता त्यानेही तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत वाशी ब्ल्यू डायमंड चौकात येऊन सिंग यांची विसरलेली बॅग परत केली. या बॅगेत  खरेदी केलेल्या महागड्या वस्तू आणि रोकड होती.

हेही वाचा… एपीएमसीत कोथिंबीर आवक वाढली, दर निम्म्यावर

पोलिसांना माहिती मिळताच  झाल्यावर अवघ्या वीस मिनिटात आणि तेही रात्री सव्वाबारा वाजता सिंग यांना आपली वस्तू मिळाल्याने त्यांनीही आनंद व्यक्त केला. सिंग यांनी रिक्षा क्रमांक लक्षात ठेवल्याने हे त्वरित शक्य झाले. आपणही रिक्षा टॅक्सीतुन प्रवास करताना आवर्जून त्याचा क्रमांक लक्षात ठेवावा, वा लिहून ठेवावे किंवा मोबाईल मध्ये फोटो काढावा . जेणेकरून काही घटना घडली तर पोलिसांना तपासकामी मोलाची मदत होईल असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी केले आहे.   

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With the help of the traffic police in navi mumbai a man got the bag back in twenty minutes dvr