पनवेल : विचुंबे येथे राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिची ३० लाख रुपयांची फसवणूक ऑनलाईन पद्धतीने केली आहे. याबाबतचा गुन्हा मंगळवारी नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विचुंबे येथे राहणारी महिला घरी असताना तीला फेसबूकवरुन संपर्क साधण्यात आला. फेसबूकवरील व्यक्तीने संबंधित महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचे या महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मार्च ते एप्रिल या दरम्यान ही घटना घडली. सुरुवातीला पैसे, भेटवस्तूंचे आमिष दाखविण्यात आले. आणि विश्वास संपादन झाल्यानंतर भेटवस्तू मिळविण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यात ऑनलाईन पैसे भरणा करण्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा…पनवेल : मामाच्या घरी पळून गेलेल्या पाच मुलांना पोलिसांनी शोधले

पिडीत महिलेची तब्बल ३० लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नवी मुंबईच्या पोलीस दलाच्या सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन कदम यांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणात तांत्रिक माहितीच्या आधारे ऑनलाईन भामट्यांचा शोध घेत आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman cheated of rs 30 lakh in online love scam cyber police investigate in panvel psg