शीव पनवेल मार्गावर नवी मुंबईतील तुर्भे येथे दुचाकी आणि ट्रकच्या अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच तुर्भ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. हा अपघात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. मात्र, अद्याप या प्रकरणी रात्री आठ वाजेपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- उरण शहरातील मासळी बाजाराची दुरवस्था; कोसळणाऱ्या छतामुळे मच्छिमार व्यापाऱ्यांसह ग्राहकांच्या जीवाला धोका

नवी मुंबईतुन जाणारा शीव पनवेल महामार्ग देशात सर्वात व्यस्त मार्गापैकीं एक समजला जातो. हा महामार्ग असला तरी शहरातून जात असल्याने शहरांतर्गत वाहतूकही मोठ्या प्रमाणात या मार्गावर असते. त्यामुळे सदर मार्ग दुचाकी स्वारांसाठी अनेकदा मृत्यूचा सापळा ठरत आहे. दरवर्षी या मार्गावर किमान ३० जणांचा अपघातात मृत्यू होतो. त्यात बहुतांश अपघात हे पावसाळ्यात होतात. आजही (गुरुवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास वाशी हून सीबीडीकडे जाताना तुर्भे येथे एका ट्रक चालकाने स्कुटी चालक महिलेस ठोकर दिल्याने तिचा मृत्यू झाला.