८ मार्च रोजी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवी मुंबईतील महिलांसाठी सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये ‘हर हॅपीनेस वीक’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘हर हॅपीनेस वीक’द्वारे महिलांमधील फॅशन डेस्टिनेशनद्वारे स्त्रीत्व साजरे करण्याचा प्रयत्न आहे.
सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल सहा मार्च ते १० मार्चपर्यंत ‘हर हॅपीनेस वीक’ साजरा करणार आहे. ज्यामध्ये विविध क्षेत्रात अजोड कामगिरी करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला जाणार आहे. मॉलमध्ये येणाऱ्या स्त्रियांसाठी १० मार्चपर्यंत ‘एंटर अज अ वुमन. वॉक आउट अज अ क्वीन’ या मध्यवर्ती संकल्पनेला साजेसे विविध कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.
एसजीसी मॉलचे केंद्र प्रमुख निलेश सिंग म्हणाले, ‘सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल ही एक अशी जागा आहे, जिथे आम्ही स्त्रीत्व साजरे करण्यासाठी कधीच प्रसंगाची वाट पाहिली नाही. मात्र, ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन ही आमच्यासाठी सर्व स्त्रियांना अनोखा व अविस्मरणीय अनुभव देण्याची चांगली संधी आहे असे वाटले. सर्व कार्यशाळा, ऑफर्स आणि सत्रांचे आम्ही १० मार्चपर्यंत नियोजन केले आहे.’
अशा आहेत विविध प्रकारच्या कार्यशाळा
६ मार्च – ‘सर्व’द्वारे योग कार्यशाळा आणि वर्निकाद्वारे खाद्यपदार्थांवर आधारित कार्यशाळा
८ मार्च – खाद्यपदार्थ आणि प्रवास लेखक कल्याण करमरकर यांच्याद्वारे ‘सोल कँडी’ ही फूड स्टायलिंगवर आधारित कार्यशाळा
९ मार्च – फूड स्टायलिस्ट अलोक वर्मा यांच्यातर्फे ‘द सिक्रेट इन्ग्रेडियंट’ ही स्मार्टफोन फोटोग्राफी कार्यशाळा
९ मार्च – फॅशन ब्लॉगर अनाम चस्मावाला यांच्यातर्फे ‘ब्युटी रिफाइन्ड’ ही त्वचेची काळजी व मेकअपसंदर्भातील कार्यशाळा
१० मार्च – मास्टर प्रशिक्षक सुचेता पाल यांच्यातर्फे ‘शेक इट ऑफ’ ही झुम्बा कार्यशाळा