या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बिहारमधून मुंबईत पळून आलेल्या प्रेमीयुगुलाची नोकरीच्या आमिषाने फसवणूक

प्रेमासाठी घराबाहेर पडलेल्या बिहार राज्यातील बेगुसराई येथील मुलीवर नवी मुंबईतील एका दलालाने बलात्कार करून तिची वेश्या व्यवसायासाठी ४० हजार रुपयांना विक्री केल्याची घटना घडली. नोकरीचे आमिष दाखवून दलालाने पीडित मुलीला जाळ्यात ओढले. त्यानंतर पुणे येथील एका महिलेला तिची विक्री केली. २५ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. यासंदर्भात तक्रार झाल्यानंतर मुलीच्या शोधासाठी नवी मुंबई आणि पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करून विविध ठिकाणी छापे टाकले. यात पाच जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी मुलीची अखेर सुटका केली.

बिहारमधील शुद्धीनगरमध्ये राहणारी पीडित मुलगी अकरावीत शिकत आहे. शेजारील नितीशकुमार महंतो (वय १८) याच्याशी पीडित मुलीचे प्रेम जुळले. याच काळात नितीशने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर नितीशने तिला लग्नाचे वचन दिले. याच कारणावरून २३ ऑक्टोबरला ती घरातून पळून आली. या वेळी तिच्यासोबत नितीश होता. यासाठी नितीशचा मित्र उमेश सहाय (वय १८) याने दोघांना पळून जाण्यासाठी मदत केली. उमेश, नितीश आणि पीडित मुलगी हे तिघे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे २५ ऑक्टोबर रोजी पहाटे उतरले. याच वेळी बिहारी भाषा बोलणारा मनोजसिंग राजाराम चौहान (वय ४०) याच्याशी त्यांची गाठ पडली. मनोजने उत्तम नोकरी देण्याचे आमीष दाखवून त्यांना पनवेल रेल्वेस्थानकात आणले. स्थानकाबाहेर आल्यानंतर त्यांच्याजवळ एक महिला भेटण्यासाठी आली. त्यानंतर पीडित मुलीला महिलेच्या ताब्यात देण्यात आले. मनोजने नितीश आणि उमेशला दादर येथे नोकरी लावतो, असे सांगून घेऊन गेला. त्यानंतर तो तेथून पसार झाला. नितीश आणि उमेश यांना पनवेल स्थानकात भेटलेली महिला आणि मुलगी न सापडल्याने त्यांनी पनवेल शहर पोलिसांत धाव घेतली.

सुरुवातीला भीतीने नितीशने पोलिसांना पीडित मुलगी बहीण असून तिला कोणीतरी पळविल्याचे सांगितले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनी पीडित मुलीच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन केले. लोकमान्य टिळक टर्मिनस ते पनवेल स्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या शुक्रवारपेठेतील  शिल्पा ऊर्फ माजिदा रहमान अली लश्कर हिला अटक केली. मुलीला पळवून आणणाऱ्या नितीशवरही गुन्हा दाखल झाला आहे.