नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरभर राबविण्यात येणाऱ्या विविधांगी स्वच्छता उपक्रमात लोकसहभागावर व त्यातही महिलांच्या सहभागावर विशेष भर दिला जात आहे. नुकतीच महानगरपालिकेने पाच हजारांहून अधिक महिला आणि विद्यार्थ्यांची ‘स्वच्छता संग्राम रॅली’ आयोजित करून ‘स्वच्छोत्सव २०२३’ अत्यंत उत्साहात साजरा केला. घरातील दैनंदिन स्वच्छतेमध्ये महिला फार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे सार्वजनिक स्तरावरील स्वच्छता मोहिमांमध्येही सर्व वयोगटातील महिला उत्साहाने सहभागी होताना दिसतात. स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध लक्षात घेऊन नेरुळ येथील महिलांच्या पिंकेथॉन या संस्थेने हाती घेतला असून नेरूळ विभागातील महिलांनी उत्साही सहभाग घेत सेक्टर १९ नेरुळ येथील आरटीओ ट्रॅकभोवतालच्या परिसरची स्वच्छ्ता केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कोपरखैरणेतील पालिकेच्या बहुउद्देशीय इमारतीतील सीसीटीव्ही यंत्रणा निकामी; चोरीच्या घटनांनी नागरिक हवालदिल

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमात प्लास्टिकच्या बाटल्या, फेकून दिलेले प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून पिंकेथॉनच्या महिलांनी एक आदर्श उभा केला. अशाच प्रकारे इंडियन मेरिटाईम युनिव्हर्सिटी येथील विद्यार्थ्यांनी टीएस चाणक्यसभोवतालच्या खाडी परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेऊन सागरी किनारा स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमातही विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. या मोहिमेत खारफुटी परिसरातील कचरा तसेच प्लास्टिक सहभागी विद्यार्थी व त्यांचे प्राध्यापक व स्वयंसेवक यांनी गोळा करून जनजागृती केली.

हेही वाचा >>> सावधान!… तुम्ही डाऊनलोड केलेले ॲप रिमोट कंट्रोल ॲप तर नाहीत ना ? काही क्षणात बँक खाते रिकामे होईल… वाचा नेमका काय प्रकार आहे? 

अनेक विद्यार्थिनी, विद्यार्थी व नागरिकांनी खाडीकिनाऱ्याचा परिसर कचराविरहित करण्याचा संकल्प तडीस नेला. या दोन्ही उपक्रमांत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता निरीक्षक विजय नाईक व  नवनाथ ठोमरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह महत्त्वाची भूमिका बजावली. नागरिकांनीही व त्यातही महिलांनी शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच आपल्या घरातूनच कचरा तीन प्रकारे वर्गीकरण करून कचरा गाडीत द्यावा, मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून खतनिर्मिती करावी, त्यासाठी सोसायटीच्या आवारात कंपोस्ट पीट्स तयार करावेत, घरगुती खत टोपलीचा वापर करावा आणि प्लास्टिक दैनंदिन वापरातून हद्दपार करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी केले आहे.