कळंबोलीतील सेक्टर पाच मधील समाज मंदिरात महिला दिनी, मंगळवारी सकाळी ११ वाजता ‘मनस्वी केंद्रा’चे उद्घाटन होत आहे.
महिलांसाठी कायदेशीर मार्गदर्शन केंद्र, ग्रंथालय आणि अभ्यासिका, तसेच आरोग्यविषयक उपक्रम आणि महिलांसाठी फिटनेस सेंटर अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मंगळवारी या केंद्राचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या हस्ते पार पडणार आहे. या केंद्रातून महिलांना मार्गदर्शन मिळण्याची सोय सिडकोने केली असली तरीही या केंद्राचे उद्घाटनाची वेळ कळंबोलीतील महिला संघटनांना सांगण्यात आलेली नाही. महिला वर्गाला एक नवी दिशा या केंद्रामुळे मिळणार असली तरीही सिडकोच्या विविध वसाहतींमधील महिला वर्गाला या केंद्राचा लाभ होण्यासाठी सिडकोने प्रचार करण्याचीगरज आहे, असे मत महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
नवी मुंबईतील महिलांसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या महिला संघटनांना या उद्घाटनामध्ये सामील होण्यासाठी सिडकोने बैठका घेतल्या होत्या. विशेष म्हणजे या संघटनेविषयी नवी मुंबईतील महिला अनभिज्ञ आहेत.
कळंबोलीमध्ये सिडकोचे ‘मनस्वी’ केंद्र
मंगळवारी सकाळी ११ वाजता ‘मनस्वी केंद्रा’चे उद्घाटन होत आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 08-03-2016 at 00:47 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens day celebration in navi mumbai